पुणे - 'झेंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा', 'ए वतन मेरे आबाद रहे तू, हम होंगे कामयाब'. अशा देशभक्तीपर गीतांचे पुणे मेट्रोमध्ये बसून सादरीकरण करीत ३०० विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आगळीवेगळी मानवंदना दिली. हर घर तिरंगा या अभियानाला प्रतिसाद देत तिरंगी ध्वज हातात घेऊन भारत माता की जय, असा जयघोष करीत विद्यार्थ्यांनी मेट्रोची सफर केली आहे.
मेट्रोत बसून देशभक्तीपर गीतांचे समूहगान - निमित्त होते, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस्, नऱ्हेमधील चार विभागांतील प्रत्येकी ७५ विद्यार्थी याप्रमाणे एकूण ३०० विद्यार्थ्यांसाठी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित मेट्रो सफरीचे. यावेळी जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस्चे उपाध्यक्ष अॅड. शार्दुल जाधवर, पुणे मेट्रोचे मनोजकुमार डॅनियल, दीपक पिल्ले आदी उपस्थित होते. गरवारे मेट्रो स्टेशन ते वनाझ व परतीचा प्रवास करीत विद्यार्थ्यांनी मेट्रोत बसून देशभक्तीपर गीतांचे समूहगान केले.