पुणे - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपला फोन टॅप केला आणि त्याचे नाव वेगळेच ठेवले असा आरोप केला आहे. या संदर्भात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी चौकशी समिती नेमली आहे. लवकरच त्यामधील कुणावर तरी यासंबंधी जबाबदारी दिली जाईल. मात्र, लोकशीही व्यवस्थेत लोकप्रतिनीधींचा असा फोन टॅप करणे योग्य नाही, अशी प्रतिक्रीया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. लोकप्रतिनिधींचा फोन टॅप करणे हे कायद्यात बसत नाही. कायदा हा आमली पदार्थांविषयी, देशाच्या सुरक्षिततेविषयी, कायदा सुव्यवस्थेविषयी धोका यासाठी तयार केला आहे. मात्र, अशा पद्धतीने लोकप्रतिनिधींचा फोन टॅप करणे योग्य नाही असे मत पवार यांनी व्यक्त केले. याबाबत चौकशी समिती नेमली असून, त्याबाबत चौकशी केली जाईल असही पवार म्हणाले.
'सहकार क्षेत्राची खरी वाढ महाराष्ट्रातच झाली'
सहकार क्षेत्राबाबत खरतर केंद्राने त्यांचे काम करावे, राज्याने त्यांचे काम करावे. केंद्राने काय करावे तो त्यांचा अधिकार आहे. दरम्यान, सहकार क्षेत्राची मुहर्तमेढ ही 100 वर्षापूर्वीच रोवली गेलेली आहे. त्याचे कायदे नियम त्या-त्या राज्याने ठरवलेले आहेत. त्यामुळे केंद्राने केंद्राच काम करावे, राज्याने राज्याच करावे अस पवार म्हणाले.