महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

National Academy of Arts : 'त्यांच्या'ही आत्म्याला मिळाली शांती; राष्ट्रीय कला अकादमीच्यावतीने 'त्या' मृतदेहांचे अस्थी विसर्जन

हिंदू धर्मात अंत्यसंस्कारानंतर मृत व्यक्तीच्या अस्थींचे विसर्जन केले जाते परंतु अपघात किंवा इतर कोणत्याही कारणाने रस्त्यांवर अनेक जण मृत्युमुखी पडतात. त्यात तर काही मृतदेहांची ओळख पटवणे अवघड असते, त्यामुळे हे मृतदेह बेवारस अवस्थेतच (Immersion of bones of the destitute bodies Pune) राहतात. अशा बेवारस मृतदेहांच्या अस्थींचे विसर्जन पुण्यातील राष्ट्रीय कला अकादमीच्या वतीने करण्यात (National Academy of Arts on destitute bodies) आले.

Immersion of bones of the destitute bodies Pune
राष्ट्रीय कला अकादमी अस्थी विसर्जन

By

Published : Sep 25, 2022, 12:21 PM IST

पुणे :हिंदू धर्मात अंत्यसंस्कारानंतर मृत व्यक्तीच्या अस्थींचे विसर्जन केले जाते. तरच आत्म्यास मोक्ष प्राप्ती होते, अशी धारणा आहे. परंतु अपघात किंवा इतर कोणत्याही कारणाने रस्त्यांवर अनेक जण मृत्युमुखी पडतात. त्यात तर काही मृतदेहांची ओळख पटवणे अवघड असते, त्यामुळे हे मृतदेह बेवारसअवस्थेतच (Immersion of bones of the destitute bodies Pune) राहतात. मृत व्यक्तीची जात धर्म न पाहता माणूसकीच्या भावनेतून अशा बेवारस मृतदेहांच्या अस्थींचे विसर्जन पुण्यातील राष्ट्रीय कला अकादमीच्या वतीने करण्यात (National Academy of Arts on destitute bodies) आले.

बेवारस मृतदेहांचे अस्थी विसर्जनानंतर प्रतिक्रिया देताना राष्ट्रीय कला अकादमी अध्यक्ष


पुणे महानगरपालिका ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय यांच्या सहयोगाने सर्वपित्री अमावस्येनिमित्त ८० बेवारस अस्थींचे विधिवत विसर्जन करण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर संगम घाटावर या अस्थींचे विधिवत पूजन करून विसर्जन करण्यात आले. या उपक्रमाचे यंदा १२ वे वर्ष (immersion of bones of the destitute bodies) आहे.

सर्वपित्री अमावास्येला बेवारस मृतांच्या अस्थींचे विधिवत पूजन व विसर्जन -राष्ट्रीय कला अकादमीच्या वतीने दरवर्षी सर्वपित्री अमावास्येला बेवारस मृतांच्या अस्थींचे विधिवत पूजन व विसर्जन केले जात असून या उपक्रमाचे हे बारावे वर्ष आहे. पुण्यामध्ये अनेक बेवारस मृतदेह येतात त्यांचे कोणीही नसते. त्यामुळे त्यांचे अंतिम विधी होत नाहीत. अशा मृतांच्या अस्थी विसर्जित करून त्यांना शांती लाभण्यासाठी सर्वपित्री अमावास्येला या अस्थी विसर्जित केल्या जातात. यावेळी मंत्रोच्चार आणि गीतेतील पंधराव्या अध्यायाचे पठण करण्यात आले, असं यावेळी सदाशिव कुंदेन (National Academy of Arts Pune) म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details