महापौरांच्या हस्ते अखिल मंडई गणरायाचे विसर्जन - गणेशोत्सव 2021
आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांनी सजलेल्या गज गवाक्ष अमृत कुंडात अखिल मंडई मंडळाच्या गणरायाला निरोप देण्यात आला. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते श्रीं चे विसर्जन करण्यात आले.
akhil mandai ganpati
पुणे - गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या चा जयघोष....मंत्रोच्चाराचे मंगलमय सूर...फुलांच्या पायघड्या आणि गुलाबपुष्पाचा वर्षाव करीत भावपूर्ण वातावरणात अखिल मंडई मंडळाच्या गणरायाला निरोप देण्यात आला. आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांनी सजलेल्या गज गवाक्ष अमृत कुंडात गणरायाला निरोप देण्यात आला. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते श्रीं चे विसर्जन करण्यात आले. अनंत चतुर्दशीला सायंकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गणरायाचे विसर्जन झाले.