महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

भीमा कोरेगाव हल्लेखोरांना तात्काळ अटक करा, रिपब्लिकन युवा मोर्चाचे आंदोलन - Bhima Koregaon marathi news

संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यासह गुन्हा दाखल असणाऱ्या इतर आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आहे.

रिपब्लिकन युवा मोर्चा
रिपब्लिकन युवा मोर्चा

By

Published : Dec 24, 2020, 4:51 PM IST

पुणे -भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारी 2018 रोजी झालेल्या दंगलीला जबाबदार असणाऱ्या मुख्य सुत्रधारासह इतर आरोपींना तात्काळ अटक करा, अन्यथा राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिकन युवा मोर्चा चे प्रदेशाध्यक्ष राहुल डंबाळे यांनी दिला आहे. संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यासह गुन्हा दाखल असणाऱ्या इतर आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आहे.

राहुल डंबाळे
महाविकास आघाडी सरकार आरोपीनां वाचवत आहे का? -

मागील देवेंद्र फडणवीस सरकार आरोपींना पाठीशी घालीत होते. त्यावेळी भीमा कोरेगाव दंगलीतील आरोपींना तात्काळ अटक करायला हवी, अशी मागणी काँग्रेस ,राष्ट्रवादी करत होते. परंतु आता हे पक्ष सरकारमध्ये आहेत. तरीही आरोपींना अटक होत नाही म्हणजे महाविकास आघाडी सरकार या आरोपीनां वाचवत असल्याचा गंभीर आरोप राहुल डंबाळे यांनी केला आहे.

महाविकास आघाडी मुर्दाबाद, भीमा कोरेगाव आरोपींना तात्काळ अटक करा, हल्ल्यातील पीडितांचे पुनर्वसन झालेच पाहिजे, आशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. या आंदोलनात राहुल डंबाळे, सुवर्णा डंबाळे, भीम आर्मीचे शहराध्यक्ष अभिजित गायकवाड, स्नेहल कांबळे, अजय लोंढे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

हेही वाचा-पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची डाव्या पक्षांसोबत आघाडी

ABOUT THE AUTHOR

...view details