पुणे - संशयावरुन झडती घेतलेल्या जोडप्याच्या बॅगमधून एक कोटी साठ लाख रुपये किंमतीचे तब्बल दीड किलो ब्राऊन शुगर जप्त करण्यात आली आहे. आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास बावधन परिसरातील चांदणी चौकात संबंधित कारवाई करण्यात आली. सेलवम नरेशन देवेंदर(57) व वासंती चिनू देवेंदर(57) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे असून, दोनही आरोपी सायन कोळीवाडा येथील रहिवासी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कोथरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना त्यांना हे दाम्पत्य चांदणी चौकाजवळ संशयास्पद अवस्थेत उभे असलेले आढळले.