पुणे - पुणे शहराचा कचरा ज्या कचरा डेपोमध्ये टाकला जातो त्याठिकाणी कुठल्याही सुविधा नाहीत. वेळोवेळी मात्र यासाठी मोठा निधी देण्यात आला आहे. पालकमंत्री अजित पवारांनीच आता यामध्ये लक्ष घालावे, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. महापालिकेचे अधिकार अजित दादांना दिले तर असे प्रश्न मार्गी लागतील, असेदेखील सुळे म्हणाल्या.
प्रतिक्रिया देताना खासदार सुप्रिया सुळे हेही वाचा -आयपीएस परमबीर सिंह दोन महिन्यांच्या सुट्टीवर; ५ मे पासून पदभार दुसऱ्या अधिकाऱ्याकडे
चौकशी व्हावी -
महानगर पालिकेच्या माध्यमातून कचरा प्रकल्पासाठी जवळपास 200 कोटी रुपये देण्यात आले आहेत. मात्र, त्या पैशातून कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे हा निधी गेला कुठं? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. सोमवारी खासदार सुळे यांनी रामटेकडी येथील कचरा प्रकल्पाची पाहणी केली, त्यानंतर त्या बोलत होत्या.
निधी गेला कुठे?
पुणे शहरातील कचरा उरुळी देवाची आणि रामटेकडी येथील डेपोमध्ये कित्येक वर्षापासून येत आहे. इथे येणार्या कचऱ्यावर प्रक्रिया होणे गरजेचे असते. मात्र, सध्या कचरा डेपोतील परिस्थिती लक्षात घेता, कोणत्याही प्रकारची प्रक्रिया करण्यात आल्याचे दिसत नाही. यामुळे या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आजवर वेळोवेळी कचरा प्रकल्पाच्या प्रक्रियेसाठी जवळपास दिलेला 200 कोटी रुपयांचा निधी गेला कुठे? असा प्रश्न सुप्रिया सुळे् यांनी उपस्थित केला. यावेळी सुप्रिया सुळे यांनी इतर विषयांवरही भाष्य केले.
सत्तेचा गैरवापर नको -
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील कारवाईबाबत बोलताना, कायद्याप्रमाणे काम होऊ द्यावे. मात्र, केंद्र सरकारची ही स्टाईल ऑफ ऑपरेशन आहे. तामिळनाडू, बंगालमध्ये देखील इलेक्शनच्या आधी विरोधी नेत्यावर रेड झाल्या होत्या. आताही ईडीने सत्तेचा गैरवापर नाही केला आणि पारदर्शकता दाखवली तर कायद्यानुसार काय ते समोर येईल, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
हेही वाचा -COVID Package कोरोनाचा फटका बसलेल्या क्षेत्रांना केंद्राकडून १.१ लाख कोटींची योजना