पुणे - महाविकास आघाडी सरकारमधले मंत्री आणि आता शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांना ईडीने क्लोजर रिपोर्ट दिला आहे. प्रताप सरनाईक यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केल्यानंतर प्रताप सरनाईक यांची ईडी चौकशी सुरु झाली होती. मात्र, आता ईडीने त्या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दिला आहे. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपला चांगलेच फैलावर घेतले आहे. भाजपने सरनाईक कुटूंबियांची माफी मागावी असही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
राज्यामध्ये ज्यावेळेस महाविकास आघाडीच ससरकर सत्तेत असताना भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रताप सारनाईक यांच्यावर घोटाळा केल्याचा आरोप केला होता. मात्र, त्यानंतर ईडीने प्रताप सरनाईक कुटुंब निर्दोष असेल तर भाजपने जाहीर माफी मागावी अस सुळे म्हणाल्या आहेत. सुप्रिया सुळे नॅशनल स्पॉट एसक्सचेंज प्रकरणात 11.30 कोटींची रुपयांची मनी लॉंन्ड्री केल्याची नोटीस सरनाईक यांना बजावली होती. या प्रकरणात प्रताप सरनाईक आणि त्यांचा मुलगा विहान सरनाईक यांची चौकशी ही ईडीकडून करण्यात आली होती. मात्र, आत ईडीने या प्रकरणात सरनाईक यांना क्लीनचीट देत क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. या प्रकरणावर आता सुप्रिया सुळे चांगल्या आक्रमक झाल्या आहेत.