महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'बाळासाहेब आज हयात असते तर.. उद्धव ठाकरेंच्या निर्णयाला त्यांचा आशिर्वादच असता' - शिवसेना

भाजपसोबत युती तोडणे, त्यानंतर काँग्रेससोबत घरोबा करणे. तसेच मुख्यमंत्रीपद स्वीकारणे, या उद्धव ठाकरेंच्या निर्णयाला आज बाळासाहेब ठाकरे हयात असते तर त्यांनी पाठिंबा दिला असता आणि आशीर्वादही दिला असता, असे हरीश कैंची यांनी म्हटले आहे.

Balasaheb Thackeray
बाळासाहेब ठाकरे

By

Published : Jan 23, 2020, 8:34 AM IST

पुणे -भाजपसोबत युती तोडणे, त्यानंतर काँग्रेससोबत घरोबा करणे. तसेच मुख्यमंत्रीपद स्वीकारणे, या उद्धव ठाकरेंच्या निर्णयाला आज बाळासाहेब ठाकरे हयात असते तर त्यांनी पाठिंबा दिला असता आणि आशीर्वादही दिला असता, असे ज्येष्ठ पत्रकार हरीश कैंची यांनी म्हटले आहे.

आज बाळासाहेब ठाकरे हयात असते, तर त्यांचा उद्धव ठाकरेंच्या निर्णयाला पाठिंबा असता... पत्रकार हरीश कैंची यांचे मत

हेही वाचा... प्रभू श्रीरामाची कृपा..! मुख्यमंत्री ठाकरे पुन्हा करणार अयोध्या वारी

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आज हयात असते, तर उद्धव ठाकरे यांचा भाजपसोबत युती मोडून मुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचा निर्णय, तसेच काँग्रेससोबत जाण्याच्या घेतलेला निर्णय याला त्यांचा आशीर्वादच असता, असे मत ज्येष्ठ पत्रकार हरीश कैंची यांनी व्यक्त केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची गुरूवार 23 जानेवारीला जयंती आहे. या पार्श्वभूमीवर हरीश कैंची यांच्यासोबत बातचीत केली असता, त्यांनी आपले विचार व्यक्त केले. शिवसेनेची स्थापना झाल्यापासून अनेक चढउतार पाहिलेल्या शिवसेनेसाठी यंदाची विधानसभा निवडणुकीनंतर परिस्थिती निर्णायक ठरली. त्यातूनच आपली तथाकथित नैसर्गिक युती मोडून शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत घरोबा केला, असे कैंची यांनी सांगितले.

हेही वाचा... राज ठाकरेंनी झेंड्याचा रंगच नाही तर, मनही बदलावे - रामदास आठवले

शिवसेनेच्या भवितव्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित करणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या त्या निर्णयाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्यामुळे शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात झालेल्या या निर्णयाला बाळासाहेबांचा पाठिंबा असता का? असे विचारले असता, कैंची यांनी बाळासाहेबांनी निश्चितच पाठिंबा दिला असता, असे म्हटले आहे.

हेही वाचा... डोळ्यापुढे धूर.. गुदमरणारा श्वास..अन् आक्रोश.. 'झेन'ने सांगितला आगीचा थरार

शिवसेनेची गेल्या काळातील वाढलेली ताकद, शिवसेनेचा मित्र पक्ष म्हणवणाऱ्या भाजपकडून प्रांतीय पक्षांना गिळंकृत करण्याची वृत्ती, शिवसेनेच्या निर्मितीवेळी असलेली सामाजिक परिस्थिती आमि आताची परिस्थिती यात फरक आहे. तसेच शिवसेना सुरवातीच्या काळात काँग्रेसच्या मदतीनेच फोफावलेली सेना असे शिवसेनेला म्हटले जात होते. त्यामुळे शिवसेनेला अनेक अर्थाने सुरवातीचे काँग्रेस आणि समाजवादी पक्ष जवळचे राहिलेले असल्याने आता काँग्रेससोबत जाणे शिवसेनेला तसे फार काही वेगळे नव्हते, असे मत हरीश कैंची यांनी मांडले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details