महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी डॉ. राजेश देशमुख यांची नियुक्ती - पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख

पुण्यात यापूर्वी देशमुख आडनाव असलेल्या तीन जिल्हाधिकारींनी काम केले आहे.  राजेश देशमुख हे पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी रुजू होणारे चौथे देशमुख ठरणार आहेत.

पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख
पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

By

Published : Aug 17, 2020, 4:11 PM IST

पुणे – डॉ. राजेश देशमुख यांची पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी निवड करण्यात आली आहे. यापूर्वी जिल्हाधिकारी असलेले नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पुण्याचे जिल्हाधिकारीपद रिक्त झाले होते.

पुण्यात यापूर्वी देशमुख आडनाव असलेल्या तीन जिल्हाधिकारींनी काम केले आहे. राजेश देशमुख हे पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी रुजू होणारे चौथे देशमुख ठरणार आहेत.

एमपीएससीमधून निवड झाल्यानंतर नोकरीला सुरुवात-

भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी असलेले डॉ. राजेश देशमुख 2008 च्या आयएस बॅचचे अधिकारी आहेत. डॉ. देशमुख यांनी एमपीएससी परीक्षेत राज्यात द्वितीय क्रमांक मिळवून उपजिल्हाधिकारी पदापासून सरकारी सेवेला प्रारंभ केला होता.

राजेश देशमुख यांनी या सांभाळल्या आहेत जबाबदाऱ्या-

  • आयएसएसपदी पदोन्नती झाल्यानंतर त्यांना सातारा जिल्हा परिषदेच्या सीईओ पदाची जबाबदारी मिळाली.
  • सध्या ते हाफकिन इनस्टिटयटचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते.
  • सातारा जिल्हा परिषदेचे सीईओ असताना त्यांच्या कार्यकाळात जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा आलेख उंचावत गेला. स्वच्छ भारत अभियान, पंतप्रधान आवास योजना या योजनांची दखल अवघ्या 14 महिन्यांत देशपातळीवर घेण्यात आली.
  • 'कॉटन सिटी' अशी ओळख असलेल्या यवतमाळ जिल्ह्याची देशभरात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे राजधानी अशी ओळख झाली. शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्यामुळे २०१८ या एका वर्षात या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा १२९ ने कमी झाला. त्यावेळी डॉ. राजेश देशमुख हे नाव राज्यभर चर्चेत आले.

देशमुख यांच्या कामाची दखल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे. राज्याची सांस्कृतिक राजधानी व देशात महत्त्वाचे आयटी हब, ऑटो हब असलेल्या पुणे जिल्ह्यात काम करण्याची संधी देशमुख यांना दिली आहे.

कोरोनाच्या महामारीत रुग्णांची संख्या कमी करणे हे जिल्हाधिकारी यांच्यासमोर प्रमुख आव्हान आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details