महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

माझ्याकडे मोकळा वेळ नाही, मी भला माझी कामे भली - अजित पवार - ajit pawar on anant gite

राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. माझ्याकडे खूप कामं आहेत. कोणीही काहीही बोलेल मग त्यावर मी कशाला बोलत बसू, असे ते म्हणाले.

Ajit Pawar
उपमुख्यमंत्री अजित पवार

By

Published : Sep 21, 2021, 3:14 PM IST

पुणे - राज्यात एकीकडे माजी खासदार किरीट सोमैया यांच्याकडून महाविकास आघाडी सरकारवर आरोप केले जात आहेत. तर दुसरीकडे माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी राष्ट्रवादीवर थेट टीका केली आहे. त्यावर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. माझ्याकडे खूप कामं आहेत. कोणीही काहीही बोलेल मग त्यावर मी कशाला बोलत बसू, असे ते म्हणाले.

हेही वाचा -वैफल्याग्रस्त अनंत गीतेंचे राष्ट्रवादी संदर्भातील 'ते' वक्तव्य नैराश्यातून, खासदार सुनील तटकरेंचे प्रत्युत्तर

  • माझ्याकडे मोकळा वेळ नाही अजित पवार

आज मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर अजित पवार यांना याबाबत विचारले असता, मला खूप कामं आहेत. माझ्याकडे मोकळा वेळ नाही. कोणीपण काहीही बोलेल, मी त्यावर कशाला बोलत बसू, मला भरपूर काम आहे, मी भला माझी कामे भली, असं यावेळी अजित पवार म्हणाले.

  • बैठकीला आलेल्या मंत्र्यांनी पाळले मौन -

बैठकीला आलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री जयंत पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोणीही सध्याच्या राज्यातील राजकीय घडामोडींवर काहीही प्रतिक्रिया न देता निघून गेले.

हेही वाचा -'मिस पिंपरी-चिंचवड'च्या मानकरी ठरलेल्या विशाखा यांची गळफास घेऊन आत्महत्या

ABOUT THE AUTHOR

...view details