पुणे - केंद्रीय मंत्री नारायण राणे हे नेहमीच विविध विषय मांडून चर्चेत असतात. कधी शिवसेनेवर परखड टीका तर कधी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत असतात. पण आज पुण्यात झालेल्या कार्यक्रमात त्यांनी थेट केंद्रीय मंत्रीपदाबाबत एक गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले की, 'हे मंत्रीपद मला देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मिळालेले आहे.'
काय म्हणाले राणे? -
सूत्रसंचालन करत असताना माझा उल्लेख हा केंद्रीय मंत्री होतो. सांगितले जाते की राणे हे केंद्रात कॅबिनेट मंत्री आहे व्हाया देवेंद्र फडणवीस... ( Narayan Rane About Devendra Fadnavis ) त्यांनी आम्हाला सांगितले की दिल्लीला जा आणि सुखी रहा. आम्ही आदेश पाळला. भारतीय जनता पार्टीत आदेश पाळतात. मी आदेश पाळला आणि आज सुखी आहे. 4 महिन्यात 8 ते 9 राज्य करत मी आज 4 महिन्यांनी पुण्यात आलो आहे, असे यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितले.