पुणे - दिवाळीनिमित्त पुण्यातील बाजारपेठ ग्राहकांनी फुलून गेले आहेत. पुण्यातील मुख्य बाजारपेठ असलेली महात्मा फुले मंडई येथे नागरिकांनी खरेदीसाठी तुफान गर्दी केली आहे. शहरात कोरोनाचे रुग्ण जरी कमी होत असले, तरी कोरोना संपलेला नाही, याचा विसर सर्वसामान्य नागरिकांना झाला की काय? असा प्रश्न उद्भवतो. तुळशी बाग, लक्ष्मी रोड रस्त्यावर अक्षरशः ग्राहकांची खरेदीसाठी तोबा गर्दी झाली आहे. त्यामुळे, शिवाजी रस्त्यावरची वाहतूक बंद करण्यात आली. दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दुकानदारांकडून वेगवेगळे ऑफर सुद्धा दिले जात आहेत. या गर्दीचा आढावा 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीने घेतला.
पुण्यातील महात्मा फुले मंडईत नागरिकांची तुफान गर्दी; लोकांना कोरोनाचा विसर - Mahatma Phule Mandai people crowd
दिवाळीनिमित्त पुण्यातील बाजारपेठ ग्राहकांनी फुलून गेले आहेत. पुण्यातील मुख्य बाजारपेठ असलेली महात्मा फुले मंडई येथे नागरिकांनी खरेदीसाठी तुफान गर्दी केली आहे. शहरात कोरोनाचे रुग्ण जरी कमी होत असले, तरी कोरोना संपलेला नाही, याचा विसर सर्वसामान्य नागरिकांना झाला की काय? असा प्रश्न उद्भवतो.
दिवाळी खरेदी महात्मा फुले मंडई