महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

HSC SSC Result : दहावी बारावीचे निकाल वेळेतच, पुणे शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांची माहिती - Sharad Gosavi in Pune

राज्यातील विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षकांनी दहावी बारावीचे पेपर तपासणार नाही असा आक्रमक पावित्रा घेतला होता. त्यामुळे दहावी, बारावीचे निकाल वेळेत लागतील की नाही याबाबत पालक व विद्यार्थ्यांत संभ्रम निर्माण झाला होता. यावर पुणे शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनी माहिती दिली ( Sharad Gosavi in Pune ) आहे. ते म्हणाले की, दहावी, बाराबीचे निकाल हे वेळेतच लागण्यात ( HSC SSC result will declare on time ) येतील.

HSC SSC Result
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

By

Published : Apr 1, 2022, 3:07 PM IST

पुणे - आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही दहावी बारावीचे पेपर तपासणार नाही असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला होता. त्यामुळे 10 वी, 12 वीच्या परीक्षेचा निकाल लागण्यासाठी उशिर होईल अशी स्थिती होती. मात्र, यावर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे ( Education Board Pune ) अध्यक्ष शरद गोसावी यांनी माहिती ( Sharad Gosavi in Pune ) दिली आहे. की, आम्ही १० वी, १२ वीचे निकाल हे वेळेतच लागणार ( HSC SSC result will declare on time ) आहोत.

पुणे शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांची प्रतिक्रिया

तर पर्यायी व्यवस्था उपलब्ध करू -काही दिवसांपूर्वी विना अनुदानित शिक्षक संघटनेने पेपर तपासायला विरोध केला होता. यावर बोलताना शरद गोसावी यांनी विनाअनुदानित शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार सकारात्मक असून याबद्दल सकारात्मक निर्णय होईल . त्याचारोबर पुणे आणि औरंगाबाद या विभागाकडून आलेले निवेदन राज्य सरकारला पाठवल असून आपल्या मागण्या मान्य होतील मात्र विद्यार्थी तसेच पालकांना वेठीस धरू नये असे आव्हान देखील त्यांनी केले आहे. तसेच जर विनाअनुदानित शिक्षकांनी पेपर तपासायला नकार दिला तर पर्यायी व्यवस्था उपलब्ध करू मात्र १० वी, १२वीचे निकाल वेळेतच लागणार असा सूचक इशारा देखील शरद गोसावी यांनी दिला आहे.

जूनच्या पहिल्या आठवड्यापूर्वी निकालाची शक्यता - मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेचे निकाल हे जाहीर होत असतात. दरवर्षी बोर्डाचे पेपर झाल्यानंतर लगेच शिक्षक पेपर तपासणीला सुरुवात करत असतात. मात्र दहावी आणि बारावीचे पेपर संपून अनेक दिवस गेल्यानंतर सुद्धा विनाअनुदानित शिक्षकांनी एकही पेपर तपासायला घेतलेला नाही.

हेही वाचा -SC On Anil Deshmukh Case : सर्वोच्च न्यायालयाचा ठाकरे सरकारला दणका; अनिल देशमुख प्रकरणाचा तपास सीबीआय करणार

ABOUT THE AUTHOR

...view details