पुणे- बारावीच्या परीक्षा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. आज (दि. 9 फेब्रुवारी) दुपारी एक वाजल्यापासून बारावीच्या वद्यार्थ्यांना ऑनलाइन हॉल तिकीट मिळणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे. हे हॉल तिकीट ( HSC Exam Hall Ticket ) विद्यार्थांना ऑनलाइन पद्धतीने मिळणार असून विद्यार्थांना दुपारी 1 वाजल्यापासून ते डाऊनलोडसाठी उपलब्ध झाले आहेत.
राज्यात यंदा 14 लाख 75 हजार विद्यार्थी हे बारावीच्या परिक्षेला बसणार आहेत. त्या साऱ्यांना आता हॉल तिकीट ( HSC Exam Hall Ticket मिळण्यास सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांना हॉल तिकीटवर काही अडचण आल्यास विभागीय मंडळाकडे संपर्क साधण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे. त्याचबरोबर दहावीचे हॉलतिकीटही 20 फेब्रुवारीपासून मिळण्यास सुरू होणार, अशी प्राथमिक माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे.