पुणे - राज्यभरात आंब्याच्या महोत्सवाला सुरवात झाली असून, राज्यातील विविध भागांतून पुण्यातील गुलटेकडी येथील मार्केटयार्डात मोठ्या प्रमाणात आंब्याच्या आवकाला सुरवात झाली आहे. नागरिक देखील वर्षभर आंब्याच्या खरेदीसाठी वाट बघत असतात. पण, नागरिकांनी आंबा खरेदी करताना सावधागिरी बाळगायला हवी. कारण, आंबा विक्रीत मोठ्या प्रमाणात फसवणूक होऊ शकते आणि तशी फसवणूक देखील झाली आहे. त्यामुळे, आंबा नेमका कोणत्या भागाचा आहे, हे कसे ओळखायचे हे आपण जाणून घेणार आहोत.
माहिती देताना व्यापारी आणि अधिकारी हेही वाचा -HSC Center Changed In Pune : पुणे तिथे काय उणे; चक्क बारावीचे परीक्षा केंद्रच बदलले?
मार्केट यार्डात कित्येक वर्षांपासून हापूस आंब्याची मोठ्या प्रमाणात विक्री होते. रत्नागिरी, देवगड येथून मोठ्या प्रमाणात आवक होते. कर्नाटकातूनही आंब्याची आवक होत असते. कर्नाटक, तसेच रत्नागिरी आंब्याची चव आणि सुगंध यामध्ये फरक दिसून येतो. रत्नागिरी हापूस आंब्याचा सुगंध, चव वेगळी असल्याने त्याला सातत्याने मागणी कायम आहे. त्यामुळे, त्याचाही भाव वाढलेला असतो. कर्नाटकामध्ये अनेक उत्पादकांनी रत्नागिरीची झाडे लावली आहेत. त्यामुळे, काही वर्षांपासून कर्नाटक हापूस आंब्याची रत्नागिरी म्हणून विक्री करण्याचा प्रकार दर वर्षी घडतो. त्यामुळे, ग्राहकांची फसवणूक होते. यंदा केरळचा आंबा देवगडचा म्हणून विकण्याचा प्रकार घडला आहे.
कसा ओळखावा फरक
रत्नागिरीचा हापूस आंबा हा पातळ असून आतमध्ये तो केसरी रंगाचा आढळून येतो. आणि तो खायला गोड असतो. पण, दुसरीकडे कर्नाटक आंबा जो रत्नागिरीचा हापूस म्हणून विकला जात आहे त्याची साल ही जाड असते आणि तो कापल्यानंतर आतमधून पिवळ्या रंगाचा असतो. आणि खायला आंबट असतो. यात दोन्ही आंब्यांमध्ये मुख्य फरक म्हणजे रत्नागिरीची पेटी ही 4 डझन ते 10 डझन पर्यंत असते. आणि तसे पेटीवर देखील लिहिलेले असते. आणि डझन बरोबर त्या आंब्याची संख्या देखील लिहिलेली असते. तो खरा आंबा रत्नागिरीचा आणि कर्नाटकी आंबा हा पेटीत असतो पण त्यात अशा खुणा नसतात. यातील फरक नागरिकांनी ओळखायला हवे, असे आवाहन यावेळी मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांनी केले आहे.
मार्केट यार्डात केरळ आंब्याची देवगड हापूस म्हणून विक्री
गुलटेकडी येथील मार्केट यार्डात केरळ आंब्याची देवगड हापूस म्हणून विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला. बाजार समिती प्रशासाने त्याची गांभीर्याने दखल घेतली असून, संबंधित व्यापाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत फळ बाजारातील तीन आडत्यांनी केरळ आंब्याची देवगड हापूस म्हणून विक्री केली. पेटीमध्ये प्रत्यक्षात केरळचा आंबा असल्याचे आढळून आले. त्या आडत्यांवर कारवाई करून त्यांच्याकडून एक डझनाच्या ४२ पेट्या जप्त करण्यात आल्या. त्या पेट्यांची बाजार समितीने विक्रेत्यांमार्फत विक्री करून, तसेच दंडात्मक कारवाई करून बाजार समितीला २३ हजार ७०० रुपये जमा करण्यात आले. आंबा विक्रीत गैरप्रकार आढळल्यास माल जप्तीची कारवाई केली जाणार आहे, असे देखील यावेळी प्रशासकीय अधिकारी मधुकांत गरड यांनी सांगितले.
हेही वाचा -पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्घाटन केलेल्या पुण्याच्या नदी सुधारणा प्रकल्पाला का देण्यात आली आहे स्थगिती? पहा स्पेशल रिपोर्ट..