पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil ) यांनी अजित पवार ( Ajit Pawar ) यांची विरोधी पक्षनेते निवड झाल्याबद्दल काहीसे नाराज आहेत अशी चर्चा होती. त्यावर आता जयंत पाटील ( State President Jayant Patil ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील म्हणाले की, मीच प्रदेशाचा अध्यक्ष आहे. मीच पक्षाचा अध्यक्ष आहे, मग मीच कुणावर नाराज होऊ. मी अलिप्त नव्हतो तर, मी माझ्या मतदारसंघांमध्ये माझ्या सर्व कामात कामाचा आढावा घेत होतो, त्याचबरोबर अजित पवार ( Ajit Pawar ) यांची नियुक्ती ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेली आहे. मी केलेली नाही परंतु मीच प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे मी नाराज असल्याचा प्रश्नच नाही. असेही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी म्हटले आहे.
Jayant Patil : विरोधी पक्षनेते पदावरून जयंत पाटलांची नाराजी; म्हणाले, मी... - Ajit Pawar
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( State President Jayant Patil ) नाराज असल्याच्या चर्चा सगळीकडे लंगल्या होत्या. त्यावर आता जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी राष्ट्रवादीचा काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष ( Nationalist Congress President ) आहे त्यामुळे नाराज होण्याचा प्रश्न नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. ते पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलत होते.
मंत्रीमंडळ स्थापने बद्दल नाराजी - राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात आज जयंत पाटील आले होते. त्यावेळी ते मध्यमाशी बोलताना म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी आयोजित केलेली आहे. त्यासाठी मी पुण्यामध्ये आलेलो आहे. त्याचबरोबर मंत्रिमंडळाच्या विस्ताराबद्दलचे मते सांगून कंटाळा कंटाळा आला. 36 दिवस झाले यांचे मंत्रिमंडळ स्थापन होत नाही असेही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. शिंदे गट शिवसेना एकत्र येईल का या विषयावर जयंत पाटील म्हणाले की, सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्यानंतर 40 ते 40 आमदार उद्धव ठाकरे यांच्याकडे येतील. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निकालाची वाट बघावी त्यांना दुसरा पर्याय नाही असेही जयंत पाटील म्हणाले.
हेही वाचा -Nilesh Rane : दीपक केसरकरांनी आपल्या औकातीत रहावं, अन्यथा...; निलेश राणेंचा थेट इशारा