महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

उद्यापासून 14 जिल्ह्यांमध्ये निर्बंधांत शिथिलता, पूर्ण क्षमतेने सुरू होणार हॉटेल्स, चित्रपटगृह

उद्यापासून 14 जिल्ह्यांतील प्रशासकीय घटकातील सर्व शॉपिंग कॉम्प्लेक्स, चित्रपटगृह, उपहारगृह, बार, क्रीडा संकुल, व्यायामशाळा, स्पा, जलतरण तलाव, धार्मिक स्थळ, नाट्यगृह, इत्यादी शंभर टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी असेल. पुण्यातील वाडेश्वर कट्ट्याचा आढावा घेतला 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीने.

hotels full capacity pune
हॉटेल्स पूर्ण क्षमता पुणे

By

Published : Mar 3, 2022, 3:54 PM IST

पुणे - गेल्या काही दिवसांपासून राज्यासह इतर शहरांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात घट होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील 14 जिल्ह्यांना पूर्ण लसीकरणाच्या टक्केवारीच्या आधारे 'अ' यादीत समाविष्ट करण्यात आले असून, राज्यात आणखी काही निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. उद्यापासून 14 जिल्ह्यांतील प्रशासकीय घटकातील सर्व शॉपिंग कॉम्प्लेक्स, चित्रपटगृह, उपहारगृह, बार, क्रीडा संकुल, व्यायामशाळा, स्पा, जलतरण तलाव, धार्मिक स्थळ, नाट्यगृह, इत्यादी शंभर टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी असेल. पुण्यातील वाडेश्वर कट्ट्याचा आढावा घेतला 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीने.

माहिती देताना नागरिक आणि 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

हेही वाचा -Ukraine Russia War : भारतीय विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशी का जातात?, डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले...

कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असताना शासनाने जो निर्णय घेतला आहे. तो निर्णय योग्य असून नागरिकांनी देखील खबरदारी घेतली पाहिजे. तसेच, जे काही नियमावली आहे त्याचे देखील पालन केले पाहिजे, अस यावेळी नागरिकांनी सांगितले.

राज्यात निर्बंधांत शिथिलता, ‘अ’ सूचीत १४ जिल्ह्यांचा समावेश

राज्याचे आरोग्य विभाग, तसेच कोविड कृती दल (टास्क फोर्से) यांच्यामार्फत राज्यातल्या कोविड स्थितीबाबत प्राप्त माहितीच्या आधारावर राज्यातल्या निर्बंधांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. यासाठी प्रशासकीय घटक ‘अ’ आणि प्रशासकीय घटक ‘ब’ अशी विभागणी करण्यात आली आहे. वेगवेगळ्या भागातील कोविडची सद्यस्थिती, त्या भागात असलेली जोखीम, तिथली लसीकरणाची स्थिती, पॉझिटिव्हिटी दर आणि रुग्णांनी व्यापलेली बेडची संख्या या आधारावर हे वर्गिकरण करण्यात आले आहे.

‘अ’ यादीतील प्रशासकीय घटकांमध्ये ज्या सामाजिक, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय, सणासुदीशी संबंधित कार्यक्रम, विवाह समारोह, अंतिम यात्रा किंवा इतर गर्दीच्या ठिकाणी क्षमतेच्या पन्नास टक्‍क्‍यांपर्यंत उपस्थितीची मुभा देण्यात आली आहे, परंतु, एखाद्या ठिकाणी जर एक हजारापेक्षा जास्त लोक जमणार असेल तर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासनास त्याची माहिती द्यावी लागेल आणि ते यावर निर्बंध घालू शकतील.

ज्या प्रशासकीय घटकांचा ‘अ’ यादीमध्ये समावेश करण्यात आलेला नाही, त्या ठिकाणी वरील प्रमाणे कोणत्याही कार्यक्रमासाठी क्षमतेच्या 50 टक्के पर्यंत उपस्थितीस परवानगी असेल किंवा 200 जणांची उपस्थितीची (जी कोणती कमी असेल) मुभा असेल. तसेच प्रशासकीय घटक 'अ’ यादीत समावेश असलेल्या सर्व शॉपिंग कॉम्प्लेक्स, चित्रपटगृह, उपहारगृह, बार, क्रीडा संकुल, व्यायामशाळा, स्पा, जलतरण तलाव, धार्मिक स्थळ, नाट्यगृह, पर्यटन स्थळ, मनोरंजन पार्क इत्यादींना शंभर टक्के क्षमतेने संचलन करण्यास परवानगी असेल. इतर प्रशासकीय घटकांना क्षमतेच्या 50 टक्के उपस्थितीने संचलनास परवानगी देण्यात आली आहे.

'अ’सूचीतील यादीमध्ये 14 जिल्ह्यांचा समावेश असून यात मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, भंडारा, सिंधुदुर्ग, नागपूर, रायगड, वर्धा, रत्नागिरी, सातारा, सांगली, गोंदिया, चंद्रपूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.

हेही वाचा -Pravin Darekar On Nawab Malik : मलिक यांचे मंत्रिपद वाचविण्यासाठी शरद पवार ठाकरे सरकारवर दबाव आणताहेत - दरेकर

ABOUT THE AUTHOR

...view details