महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Bunny Chow Misal : पुण्यात मिळते आफ्रिकन 'बनी चाव मिसळ'; आस्वादासाठी नागरिकांची गर्दी - पुण्यातील बनी चाव मिसळ

सध्या पुणे शहरात चर्चा आहे ती बनी चाव मिसळची. टिळक रोडवर गेल्या दीड वर्षांपासून बाप्पा मिसळ ( Bappa Misal Hotel on Tilak Road ) नावाची हॉटेल असून या ठिकाणी ही बनी चाव मिसळ ( Bunny Chow Misal ) मिळते. पुण्यात खूप प्रकारच्या मिसळ मिळतात. पुणेकरांना काहीतरी वेगळ द्यायच होत म्हणून तसा प्रयोग करायचा विचार केला आणि बनी चाव नावाचा जो साऊथ आफ्रिकन ( South African Misal Pune ) पदार्थ आहे.

बनी चाव मिसळ
बनी चाव मिसळ

By

Published : Jun 2, 2022, 4:08 PM IST

Updated : Jun 2, 2022, 9:37 PM IST

पुणे -मिसळ म्हटल की प्रत्येक चौकात एक वेगळ नाव आणि एक वेगळा प्रकारची मिसळ आपल्याला पाहायला मिळते. अशातच सध्या पुणे शहरात चर्चा आहे ती बनी चाव मिसळची. टिळक रोडवर गेल्या दीड वर्षांपासून बाप्पा मिसळ ( Bappa Misal Hotel on Tilak Road ) नावाची हॉटेल असून या ठिकाणी ही बनी चाव मिसळ ( Bunny Chow Misal ) मिळते. पुण्यात खूप प्रकारच्या मिसळ मिळतात. पुणेकरांना काहीतरी वेगळ द्यायच होत म्हणून तसा प्रयोग करायचा विचार केला आणि बनी चाव नावाचा जो साऊथ आफ्रिकन ( South African Misal Pune ) पदार्थ आहे. त्यात मिसळ बनवून मित्रांना दिली आणि तेथून या बनी चाव मिसळला सुरवात झाली, अशी माहिती हॉटेलचे मालक विवेक कुलकर्णी यांनी दिली आहे.

आढावा घेताना प्रतिनिधी


'अशी' बनविली जाते बनी चाव मिसळ :बनी चाव मिसळ बनवताना सुरवातीला एक मोठा ब्रेड असतो. त्याला कापून त्याचे दोन भाग करतात. त्या ब्रेडचा मध्यभाग पूर्ण कट करून वेगळा करतात. मग या ब्रेडच्या चारही बाजूला बटर लावून तो तव्यावर ग्रील केला जातो. त्यांनतर त्या ब्रेडमध्ये बटाट्याची भाजी, चिवडा, रस्सा, मग चिवडा आणि वरती मटकी, कांदा आणि चीझ अस टाकून बनी चाव मिसळ बनविली जाते, अशी माहिती देखील यावेळी कुलकर्णी यांनी दिली आहे.


मिसळ खाण्यासाठी गर्दी :सध्या मिसळ प्रेमींमध्ये या बनी चाव मिसळ बाबत मोठा आकर्षण असून लांबून ही मिसळ खाण्यासाठी पुणेकर येथे येत आहे. ही मिसळ झाल्यानंतर याच्या वेगळेपणाबाबत कौतुक देखील करत आहे.

हेही वाचा -Maharashtra rainfall : राज्यात सरासरी 101 टक्के पाऊस पडण्याची शक्यता - डॉ. रामचंद्र साबळे

Last Updated : Jun 2, 2022, 9:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details