पुणे -पुण्यातील सासवड परिसरामध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एका हॉटेल चालकाने उकळते पाणी टाकून तीन भिकाऱ्यांचा निर्दयी खून केला आहे. या घटनेत तिन्ही कचरा वेचक भिकाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ( kills three beggars by pouring hot boiling water in pune )
तिन्ही भिकारी पूर्णपणे भाजले - पप्पू उर्फ निलेश जयवंत जगताप या हॉटेल चालकाने कचरा वेचक भिकाऱ्यांना बेदम मारहाण करुन त्यांच्या अंगावर उकळते पाणी टाकून त्यांचा खून केला आहे. ही घटना 23 मे रोजी सासवडमध्ये घडली आहे. या हत्याकांडातील मयत तिन्ही भिक्षेकरी पपू जगताप यांच्या हॉटेल जवळ असलेल्या अहिल्यादेवी मार्केट जवळ ओसरीवर दररोज बसत होते. याचाच राग मनात धरून पप्पू जगताप यांनी या तिघांना सर्वप्रथम काठीने मारहाण केली. पण भिकारी अजून कसे गेले नाहीत, म्हणून पप्पू जगताप याने त्याच्या हॉटेलमधील गरम पाणी या तिन्ही भिकाऱ्यांच्या अंगावर ओतले. यात तिन्ही भिकारी पूर्णपणे भाजून निघाले आणि यात तिघांचा मृत्यू झालाय.
पोलिसांकडून घटनेकडे दुर्लक्ष - ज्या ठिकाणी हे हत्याकांड झाले आहे, त्या ठिकाणपासून सासवड पोलिस स्टेशन अगदी हाकेच्या अंतरावर आहे. मात्र पोलिसांनी ह्या घटनेकडे दुर्लक्ष केले. या हत्याकांडातील आरोपी पप्पू उर्फ निलेश जयवंत जगताप हे स्थानिक आमदाराचे नातेवाईक असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.