पुणे - शहरात सध्या कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे, पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रोज वाढते आहे, आणि त्यात गंभीर रुग्णांची संख्या ही मोठी आहे. रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने, शहर आणि परिसरात वेळेवर हॉस्पिटल मिळण्याची मारामार आहे. त्यातच आता रुग्ण दगावल्याने हॉस्पिटलची तोडफोड करण्याचे प्रकार समोर येत आहेत. सोमवारी पुण्यात रुग्ण दगवल्याने नातेवाईकांनी हॉस्पिटलची तोडफोड केल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. देहूरोड परिसर आणि वाघोलीमध्ये रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली आहे.
कोरोना रुग्ण दगावल्याने संतप्त नातेवाईकांची दोन रुग्णालयात तोडफोड नातेवाईकांची रुग्णालयात तोडफोड
वाघोली येथील मोरया हॉस्पिटलमध्ये मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयात शिरून तोडफोड केली. एका 32 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी रुग्णालयात घुसून रुग्णालयाची तोडफोड केली. तर अन्य एका घटनेमध्ये कोरोनाबाधित रुग्णाला योग्य उपचार न मिळाल्याने रुग्ण दगावल्याचा आरोप करत, नातेवाईकांनी पुण्यातील देहूरोड इथल्या रुग्णालयात गोंधळ घालत तोडफोड केली. देहूरोड कॅन्टोमेंट बोर्डाच्या रुग्णालयात ही तोडफोड करण्यात आली, तसेच यावेळी झालेल्या मारहाणीमध्ये एक कर्मचारी देखील गंभीर जखमी झाला आहे.
हेही वाचा -बारामतीत कोरोना वाढला; जेष्ठ नगरसेवक गुजर यांनी आरोग्य व्यवस्थेबाबत दिली 'ही' माहिती