पुणे - भारतीय संस्कृतीमध्ये नारीला शक्तीचे रूप मानले जाते. त्यामुळे नवरात्रीमध्ये नारी शक्तीची पूजा, उपासना केली जाते. देवदासी महिला व तृतीयपंथी हे समाजातीलच विशेष घटक आहेत. त्यामुळे त्यांच्या सन्मानाचे आयोजन करण्यात आले होते. तृतीयपंथी भगिनींचे औक्षण करून त्यांच्या हातावर मेहंदी काढून नवरात्रीनिमित्त त्यांचादेखील पुण्यातील साईनाथ मंडळ ट्रस्टच्यावतीने सन्मान करण्यात आला.
प्रतिनिधींनी घेतलेला आढावा साईनाथ मंडळ ट्रस्ट व मृग नयनी मेहंदी आर्ट यांच्यावतीने बुधवार पेठेतील ढमढरे गल्ली येथे 'त्यांचाही सन्मान' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आशीर्वाद संस्था व पन्ना घाबरले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हा विधी प्राधिकरण पुणे सदस्य सचिव प्रताप सावंत, साईनाथ मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष पीयूष शहा आदी उपस्थित होते.
तुतीयपंथी आणि देवदासी महिलांचा मेहेंदी काढून सन्मान म्हणून या महिलांचा करण्यात आला विशेष सन्मान -
तृतीयपंथीयांनी बुधवार पेठेतील महिलांसाठी खूप मोठे काम केले आहे. मागील दोन वर्षाच्या कोविडकाळात पन्ना घाबरेल यांनी बुधवार पेठेतील महिलांना भोजनाची व्यवस्था केली आहे. त्यांच्या कार्यासाठी आज त्यांचा विशेष सन्मान करण्यात येत आहे. त्याच पद्धतीने आज समाजात या महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. मात्र नवरात्र उत्सवात नारी शक्तीचा सन्मान केला जातो म्हणून साईनाथ मित्र मंडळाच्यावतीने या भागातील तृतीयपंथीय तसेच देवदासी महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला .तसेच या महिलांच्या हातावर मेहंदी देखील काढण्यात आली असल्याचे साईनाथ मंडळाचे अध्यक्ष पीयूष शहा म्हणाले.
तुतीयपंथी आणि देवदासी महिलांचा मेहेंदी काढून सन्मान आता समाजाचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला -
आज समाजात आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. अशा पद्धतीने नवरात्र उत्सवात आमचा सन्मान कधीच करण्यात आला नव्हता. आज अशा पद्धतीने आमचा सत्कार होत आहे, म्हणून आम्हला खूप चांगलं वाटत आहे. मेहेंदी हे आम्हा महिलांसाठी खूप आवडणारी गोष्ट आहे. आज मेहेंदी काढून सत्कार झाल्याने समाजाचा आता आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे असे वाटत आहे, असे यावेळी पन्ना घाबरेल यांनी सांगितले.
हेही वाचा -Dussehra 2021 : दसऱ्याच्या 'या' आहेत महत्त्वपूर्ण परंपरा