महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

आर्यन खान प्रकरणाची वस्तुस्थिती तपासात पुढे येईल - गृहमंत्री दिलीप वळसे पाटील - pune

आर्यन खान प्रकरणाचे मास्टर माईंड सुनील पाटील असल्याचा आरोप भाजप नेते मोहीत कंबोज यांनी केला होता. या आरोपांनंतर सुनील पाटील नेमके कोण आहेत आणि त्यांचा या प्रकरणाशी नेमका काय संबंध आहे, याबाबत चर्चा सुरू झाली. सुनील पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य असल्याचाही दावा मोहीत कंबोज यांनी केला होता. त्याबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, मी धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून माहिती घेतली असून सुनील पाटील हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नाही.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

By

Published : Nov 7, 2021, 7:11 PM IST

पुणे- आर्यन खान प्रकरणावर मंत्री नवाब मलिक हे सातत्याने एनसीबीच्या कामगिरीवर तसेच एनसीबीचे अधिकारी समीर वानखडे विरोधात पुरावे सादर करत आहेत. या प्रकरणात काय वस्तुस्थिती आहे हे तपासात पूढे येईलच, असे मत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले आहे.

बोलताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

सुनील पाटील हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नाही

आर्यन खान प्रकरणाचे मास्टर माईंड सुनील पाटील असल्याचा आरोप भाजप नेते मोहीत कंबोज यांनी केला होता. या आरोपांनंतर सुनील पाटील नेमके कोण आहेत आणि त्यांचा या प्रकरणाशी नेमका काय संबंध आहे, याबाबत चर्चा सुरू झाली होती. सुनील पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य असल्याचाही दावा मोहीत कंबोज यांनी केला होता. त्यावर आता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, मी धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून माहिती घेतली असून सुनील पाटील हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नाही.

टाळता आल असता

धनंजय मुंडे यांनी घेतलेल्या कार्यक्रमात सपना चौधरी यांनी नृत्य केले. याबाबत त्यांना विचारले असता, ते टाळता आले असते, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

हे ही वाचा -नवाब मलिकांच्या पुराव्यामुळे भाजपमध्ये देखील खळबळ - आमदार रोहित पवार

ABOUT THE AUTHOR

...view details