पुणे -नववर्षाचं स्वागत करण्यासाठी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी होप 2021 अशा आशयाचा केक कट करत स्वागत केले. पोलीस कर्मचाऱ्यांना केकचे वाटप करत त्यांनी नवीन वर्षाचे स्वागत केले. नवीन वर्षानिमित्त संकल्प करत पोलीसांसाठी काम करायचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या वेळी कंट्रोल रूमला भेट देत बरोबर 12 वाजताचा तक्रारीचा कॉल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उचलला. नवीन वर्षातील तो पहिला कॉल होता. एका सोसायटीत नवीन वर्षाचे स्वागत 12 पर्यंत सुरु आहे. आवाज कमी करायला सांगा असा तो कॉल होता. लगेच त्या हद्दीतील पोलीस ठाण्याकडे त्यांनी कॉल दिला.
काही वेळात नवीन वर्षात पदार्पण -
दहा महिने डॉक्टर नर्स पोलीस सर्वजण लढत आहेत. आमचे पोलीस दिवस रात्र रस्त्यावर आहेत. ३१ डिसेंबर सर्वजण उत्साहात साजरा करतात. तरीही आम्ही कायदा व्यवस्था राखण्यासाठी काम करत आहेत. कंट्रोल रूममध्ये येऊन पोलीसांसोबत नवीन वर्ष साजरा करणार आहे. ३२ जिल्ह्यात फिरलो, पोलिसांसोबत राहीलो नागरिकांनी सहकार्य केले.
2021 संकल्प -
२०२१ मध्ये महिला अत्याचार बाबत लवकर शिक्षा झाली पाहिजे, महिला अत्याचार कमी झाले पाहिजे, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे गृहमंत्री म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांवर टीका -