पुणे -केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा ( Union Home Minister Amit Shah ) यांनी आज ( रविवारी ) त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पुण्यात NDRF च्या 5 व्या बटालियनच्या कॅम्प कॉम्प्लेक्सचे औपचारिक उद्घाटन ( Inauguration of Battalion Camp Complex ) केले. नवीन कॅम्पसची पाहणी केली आणि CFSL कॅम्पसमधील नवीन इमारतीचे उद्घाटन केले. अमित शहा यांनी एनडीआरएफच्या ( NDRF ) जवानांशी भोजन आणि संवादही साधला. यावेळी केंद्रीय गृहसचिव आणि एनडीआरएफचे महासंचालक ( Director General of NDRF ) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. एनडीआरएफच्या नव्याने बांधलेल्या संकुलात जवानांसाठी बॅरेक, मेस, अधिकारी आणि जवानांसाठी निवास, शाळा, युनिट हॉस्पिटल, एटीएम, शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि हेलिपॅड अशा सुविधा आहेत. एनडीआरएफ हे विश्वासाचे प्रतीक आहे आणि त्याची केवळ उपस्थिती लोकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करते. एवढ्या कमी कालावधीत NDRF च्या 16 बटालियन संपूर्ण देशात आपले काम अतिशय चांगल्या पद्धतीने करत आहेत, भावनाही अमित शहा यांनी आपल्या भाषणातून मांडली.
Amit Shah Pune Visit : एनडीआरएफ म्हणजे विश्वासाचे प्रतीक - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
अमित शहा ( Union Home Minister Amit Shah ) यांनी आज ( रविवारी ) त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पुण्यात NDRF च्या 5 व्या बटालियनच्या कॅम्प कॉम्प्लेक्सचे औपचारिक उद्घाटन ( Inauguration of Battalion Camp Complex ) केले. नवीन कॅम्पसची पाहणी केली आणि CFSL कॅम्पसमधील नवीन इमारतीचे उद्घाटन केले. अमित शहा यांनी एनडीआरएफच्या ( NDRF ) जवानांशी भोजन आणि संवादही साधला.
कोणत्याही प्रकारची आपत्ती, पूर, भूस्खलन, वादळ, इमारत कोसळणे किंवा वीज पडणे, प्रत्येक प्रसंगी एनडीआरएफ जवान पोहोचताच देशातील जनता दिलासा घेते. आता एनडीआरएफ आली आहे आणि आपण सर्व सुरक्षित आहोत. एवढ्या मोठ्या देशात आणि एवढ्या कठीण क्षेत्रात इतक्या कमी वेळात हा विश्वास निर्माण करणे खूप कठीण आहे आणि जेव्हा सेनाप्रमुखापासून शेवटच्या माणसापर्यंत प्रत्येकजण त्याच्या कार्यासाठी समर्पित असेल तेव्हाच हे शक्य होईल, असेही ते म्हणाले. केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले की एनडीआरएफला इतर अनेक क्षेत्रांमध्ये कौशल्य प्राप्त करण्यासाठी, एनडीआरएफ आणि एसडीआरएफला एकत्रितपणे काम करण्यासाठी आणि एनडीआरएफच्या आश्रयाने एनडीआरएफच्या बरोबरीने एसडीआरएफ बनवण्यासाठी बरेच काही करणे बाकी आहे. जोपर्यंत एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे प्रशिक्षण आणि सराव एक प्रकारे एकत्र काम करत नाही, तोपर्यंत एवढ्या मोठ्या देशात प्रत्येक आपत्तीच्या वेळी आपण लोकांना वाचवू शकणार नाही, असे अमित शहा यांनी सांगितले.
NDRF ची स्थापना 2006 मध्ये झाली आणि त्यावेळी बीएसएफ, सीआरपीएफ, आयटीबीपी, सीआयएसएफ जवानांच्या आठ बटालियन होत्या. आज या दलाच्या 16 बटालियन आणि प्रादेशिक प्रतिसाद केंद्रे आहेत. 28 शहरांमध्ये प्रादेशिक प्रतिसाद पथके देखील आहेत. NDRF ने जगभरातील आपत्ती क्षेत्राच्या सर्व पैलू आणि परिमाणांचा अभ्यास करण्यासाठी स्वतःची टीम तयार केली पाहिजे. ती टीम NDRF ला जगातील सर्वोत्तम आपत्ती प्रतिसाद दल बनवण्याच्या दिशेने नेत आहे याची खात्री करावी. आज NDRF ची गणना संपूर्ण जगातील सर्वोत्तम आणि सर्वात मोठ्या आपत्ती प्रतिसाद दलांमध्ये केली जात आहे. ही संपूर्ण देशासाठी आणि भारत सरकारसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. तुमचे समर्पण, इतिहास आणि कर्तव्यनिष्ठा यामुळे ते सिद्ध झाले आहे, असे केंद्रीय गृहमंत्री म्हणाले.
हेही वाचा -Amit Shah in Pune : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिला मुलांना जीवनात यशस्वी होण्याचा मंत्र