पुणे - कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. परिणामी अनेकांचे रोजगार बंद झाले आहेत. तसेच हॉटेल आणि खानावळी देखील बंद केल्या आहेत. या परिस्थितीत रोजंदारीवर काम करणाऱ्यां नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यातही अशा नागरिकांचे खाण्याचे अधिक हाल होत आहेत. या नागरिकांच्या मदतीसाठी पुणे शहरातील गणेश पेठेत असणाऱ्या गुरुद्वाराच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे.
लॉकडाऊन : पुण्यातील गणेश पेठमधील गुरुद्वाराकडून गरजूंना घरपोच जेवण
गरजू नागरिकांच्या मदतीसाठी गणेश पेठेतील गुरुद्वाराने पुढाकार घेतला आहे. या गुरुद्वाराच्या वतीने गरजूंना मोफत आणि घरपोच जेवण दिले जात आहे.
गुरुद्वारा गणेश पेठ पुणे शहर
हेही वाचा...नागपूर; साई मंदिराकडून दररोज 7 हजार लोकांना घरपोच जेवणाची व्यवस्था
पुण्यातील या गुरुद्वाराच्या वतीने अशा गरजू नागरिकांसाठी अन्न धान्य पुरवले जात आहे. मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा यासारखी धार्मिक स्थळे देखील लॉकडाऊन दरम्यान गर्दी टाळण्यासाठी बंद ठेवण्यात आली आहेत. परंतु पुण्यातील गुरुद्वारामध्ये अन्न तयार केले जात आहे आणि पॅकिंग करून ते अन्न गरजूंपर्यंत पोचवले जात आहे.