पुणे - छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या राजगड तालुक्याची काही ऐतिहासिक कागदपत्रे समोर आली आहेत. पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्याचे नामांतर स्वराज्याची पहिली राजधानी असणाऱ्या राजगड या नावाप्रमाणे करण्यात यावे, यासाठी इतिहास प्रेमींकडून आता अभियान राबविण्यात येत आहे.
पुणे जिल्ह्यातील दुर्गम आणि ऐतिहासिक तालुका म्हणून ओळख असलेला वेल्हा तालुका हा एकेकाळी हिंदवी स्वराज्याच्या सत्ताकारणाचा केंद्रबिंदू होता. मात्र या प्रदेशाचे ऐतिहासिक नाव राजगड असल्याचे काही पुरावे समोर आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या राजगड तालुक्याचे ऐतिहासिक दस्ताऐवज पाहता वेल्हा तालुक्याचे नामांतर करावे अशा जोरदार मागणी करण्यात येत आहे. यासाठी इतिहास प्रेमींकडून अभियान सुरू करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वीच या प्रदेशाच्या खासदार सुप्रिया सूळे यांनी ट्विटरवरून हि मागणी केली होती.