पुणे -कोथरूड परिसरातील गांधी भवन येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथी आणि हुतात्मा दिनानिमित्त जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी हिंदुराष्ट्र सेनेच्या 30 ते 40 कार्यकर्त्यांनी एकत्र येत, 'सीएए'च्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. त्या सर्व आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
'सीएए' समर्थनार्थ घोषणाबाजी... हिंदुराष्ट्र सेनेच्या आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड हेही वाचा... 'जामिया'त तरुणाचा आंदोलकांवर गोळीबार, कुटुंबीयांना बसला धक्का
कोथरूड परिसरातील गांधी भवन येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथी आणि हुतात्मा दिनानिमित्त जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, मानवी अधिकार कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड, धर्मगुरू बिशप डाबरे आणि गांधीवादी नेते कुमार सप्तर्षी आदी संबोधित करणार आहेत. सीएए, एनआरसी आणि एनपीआर विरोधी अहिंसात्मक जनआंदोलन, असे कार्यक्रमाचे विषय आहे. दरम्यान हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी कार्यक्रमस्थळी हिंदुत्ववादी संघटनेच्या सात ते आठ कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्या सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यानंतर कार्यक्रमस्थळी पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असून गांधी भवनकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
हेही वाचा... 'कोरेगाव-भीमा प्रकरणी एनआयए चौकशीचे केंद्राचे पत्र मिळाल्यानंतर पुढील पाऊल उचलणार'
दरम्यान,कार्यक्रम सुरू झाल्यानंतर हिंदुराष्ट्र सेनेच्या 30 ते 40 कार्यकर्त्यांनी कार्यक्रमस्थळी येत घोषणाबाजी केली. या आंदोलकांनी 'वुई सपोर्ट सीएए', 'देश के गद्दारो को, गोली मारो सालोको' यांसारख्या घोषणा दिल्या. पोलिसांनी या सर्व आंदोलकांची धरपकड केली असून त्यांना ताब्यात घेतले आहे.