पुणे - राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हॅलो ऐवजी वंदे मातरम म्हणण्याच्या ट्वीटवरून सध्या राज्यात वाद निर्माण झाला आहे यातच वंदेमातरम म्हणण्याला रझा अकादमीने विरोध दर्शवला आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी याला विरोध केला आहे Sudhir Mungantiwar Vande Mataram tweet राज्याच्या सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हॅलो ऐवजी वंदे मातरम म्हणण्याच्या भूमिकेचं हिंदू महासभेने याच स्वागत केल असून राज्यात आत्ता वंदे मातरम् हे सक्तीचे व्हायला हवे अशी भूमिका आनंद दवे यांनी व्यक्त केली आहे
प्रत्येक शाळेत ते सक्तीचं करावेवंदे मातरम् या घोषणेला रझा अकादमी ज्या प्रमाणे विरोध करत आहे त्यावर दवे म्हणाले की यांना वंदे मातरमची अडचण नाही तर हिंदूंना जे आवडते त्या गोष्टींना आडवे येण्याचा यांचा स्वभाव आहे हुतात्मा स्मारक फोडणार लोकांचे गळे कापणार पोलीस सरकवा म्हणणार अफजल आणि औरंगजेबाची कबर पूजणार हे सगळे आता थांबायला हवे आता वंदे मातरमलाच राष्ट्रगीत करावे आणि देशातील प्रत्येक शाळेत ते सक्तीचं करावे अशी मागणीही यावेळी दवे यांनी केली आहे