महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

दिलासादायक..! पिंपरी-चिंचवडमध्ये शनिवारी 2 हजार 107 जण कोरोनामुक्त - Pune corona latest news

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रुग्णांची एकूण संख्या 22 हजार 63 वर पोहचली असून 439 जणांचा आत्तापर्यंत शहर आणि ग्रामीण भागातील रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यात पिंपरी-चिंचवड शहरातील 349 तर ग्रामीण भागातील 90 जणांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत 14 हजार 682 जण कोरोनामुक्त झाले असून शनिवारी पहिल्यांदाच मोठ्या संख्येने रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत

Pimpari chinchwad corona updates
Pimpari chinchwad corona updates

By

Published : Aug 2, 2020, 8:23 AM IST

पुुणे- पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी दिवसभरात तब्बल 903 जण कोरोनाबाधित आढळले. तर 18 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी महानगर पालिका हद्द आणि ग्रामीण भागातील आहे. दिलासादायक बाब म्हणजे, पहिल्यांदाच एका दिवसात 2 हजार 107 जण कोरोनामुक्त झाले त्यांना घरी सोडण्यात आले. मोठ्या प्रमाणावर रुग्ण बरे झाल्याने शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले जातं आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 22 हजार 63 वर पोहचली असून 439 जणांचा आत्तापर्यंत शहर आणि ग्रामीण भागातील रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यात पिंपरी-चिंचवड शहरातील 349 तर ग्रामीण भागातील 90 जणांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत 14 हजार 682 जण आत्तापर्यंत कोरोनामुक्त झाले असून शनिवारी पहिल्यांदाच मोठ्या संख्येने रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या महानगर पालिकेच्या रुग्णालयात 3 हजार 553 सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती पिंपरी-चिंचवड महानगर पालिका आरोग्य विभागाने दिली आहे.

शनिवारी मृत झालेले रुग्ण
काळेवाडी (स्त्री ५३ वर्षे, स्त्री ६० वर्षे, स्त्री ७० वर्षे), पिंपरी (पुरुष ३८ वर्षे), निगडी (पुरुष ८० वर्षे, पुरुष ४८ वर्षे), मोशी (पुरुष ६५ वर्षे), मिलिंदनगर (पुरुष ४० वर्षे), पिंपळे गुरव (पुरुष ८० वर्षे), चिंचवड (स्त्री ४७ वर्षे,पुरुष ४८ वर्षे), चिखली (पुरुष ४२ वर्षे), वाल्हेकरवाडी(पुरुष २६ वर्षे), रहाटणी (पुरुष ६५ वर्षे), खेड (पुरुष ५५ वर्षे, पुरुष ७२ वर्षे,पुरुष ५८ वर्षे), विशालगड पुणे (पुरुष ५७ वर्षे), येथील रहिवासी आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details