पुणे : प्रख्यात नृत्यांगना, अभिनेत्री व पुणे फेस्टिव्हलच्या पॅट्रन खा. हेमामालिनी यांनी पुणे फेस्टिव्हलमध्ये ( Hema Malini Yashoda Krishna Ballet ) आज गणेश कला क्रीडा रंगमंच येथे 'यशोदा कृष्ण' बॅले सादर ( Pune Festival Hema Malini Performing ) करून रसिकांवर आनंदाची ( Delighted Audience by Performing ) बरसात केली. हेमा मालिनी यांच्या नाट्य विहार कलाकेंद्र या संस्थेच्या वतीने या बॅलेची निर्मिती करण्यात आली ( Hema Malini Performing in Pune Festival ) आहे. त्यांना ५० सहकलावंतांनी साथ सांगत केली.
भव्य अशा मंचावर हेमा मालिनींचे नृत्य सादरीकरणअत्यंत भव्य अशा मंचावर सादर होणाऱ्या या कार्यक्रमाचे सौंदर्यच आगळेवेगळे होते. भव्यता हा कार्यक्रमाचा आत्मा होता. तर शब्द, सूर, ताल याचा अनोखा संगम प्रेक्षकांनी अनुभवला. रंगमंचावर क्षणाक्षणाला बदलणारा प्रसंग सादर करताना राखलेला ताल अप्रतिम होता. आज हयात नसलेले गीतकार आणि संगीतकार रवींद्र जैन यांनी शब्द आणि सूर यांचा सुरेख संगम साधला असून, पार्श्वगायक सुरेश वाडकर, कविता कृष्णमूर्ती, रूप कुमार राठोड, पामेला जैन आणि श्री. रवींद्र जैन यांच्या आवाजांचा सुरेख संगम या कार्यक्रमाची रंगत वाढवतो. नृत्य दिग्दर्शन भूषण लखांद्री यांनी प्रत्येक पात्रास प्रकट करणाऱ्या सुंदर स्टेप्स दिल्या आहेत.
पुणे फेस्टिव्हलमध्ये सादर केलेला हा २९ वा बॅले हेमामालिनी यांनी पुणे फेस्टिव्हलमध्ये सादर केलेला हा २९ वा बॅले होता. हेमा मालिनी सादर केलेली नृत्ये आणि साधलेला ताल विलोभनीय होता. पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी व सौ. मीरा कलमाडी यांनी हेमा मालिनींचा सत्कार केला. तसेच सर्व सहकलावंतांबद्दल ऋण व्यक्त केले. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, राज्य कॉंग्रेस उपाध्यक्ष रमेश बागवे, कॉंग्रेस नेते अभय छाजेड, मुख्य संयोजक डॉ. सतीश देसाई, काका धर्मावत, नितीन न्याती, सूर्यदत्त इंस्टीट्यूटचे सौ. व श्री. संजय चोरडिया, डी. वाय. पाटील संस्थेच्या भाग्यश्री पाटील इत्यादी यावेळी उपस्थित होत्या. प्रेक्षकांनी कार्यक्रमाला प्रचंड गर्दी केली होती.