पुणे - राज्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावलेली असून मराठवाड्य़ात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. तर मध्य महाराष्ट्र, कोकणासह विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडला. तर पुढील दोन दिवस बहुतांश ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या पुणे खात्याने वर्तवली आहे.
- हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा -
राज्यात आजपासून पुढील दोन दिवस ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात पुढील दोन दिवसानंतर पावसाचा जोर कमी होत जाईल. तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
- कोकणात चार दिवस मुसळधार -
राज्यात दि. 10 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर दरम्यान कोकण विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर या दिवशी काही भागात रिपरिप पाऊस असेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवली आहे. तर 13 ऑक्टोबर रोजी काही ठिकाणी साधारण पाऊस पडण्याची शक्यता आहे.
- मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस विजांच्या कडकडाटात -