महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

लोहगाव परिसरात मुसळधार पाऊस, उपमुख्यमंत्र्यांचा ताफा वाहतूक कोंडीत अडकला - Deputy Chief Minister

लोहगाव परिसरात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही बसला आहे. रात्री साडे आठ वाजता लोहगाव विमानतळावरून भोसलेनगर येथील निवासस्थानाकडे निघालेले उपमुख्यमंत्री अजित पवार हे एका तासाहून अधिक काळ येथे वाहतूक कोंडीत अडकले होते. तिथून बाहेर पडले तर पुढे नगर रस्त्यावरील शास्त्रीनगर चौकात अडकले. सायंकाळी सहा सुमारास आलेल्या मुसळधार पावसाने लोहगाव, धानोरी, विश्रांतवाडी, येरवडा आणि नगररोड पावसाने चांगलेच झोडपले आहे.

लोहगाव परिसरात झाला मुसळधार पाऊस, उपमुख्यमंत्र्यांचा ताफा वाहतूक कोंडीत अडकला
लोहगाव परिसरात झाला मुसळधार पाऊस, उपमुख्यमंत्र्यांचा ताफा वाहतूक कोंडीत अडकला

By

Published : Oct 11, 2021, 7:02 AM IST

पुणे - लोहगाव परिसरात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही बसला आहे. रात्री साडे आठ वाजता लोहगाव विमानतळावरून भोसलेनगर येथील निवासस्थानाकडे निघालेले उपमुख्यमंत्री अजित पवार हे एका तासाहून अधिक काळ येथे वाहतूक कोंडीत अडकले होते. तिथून बाहेर पडले तर पुढे नगर रस्त्यावरील शास्त्रीनगर चौकात अडकले. सायंकाळी सहा सुमारास आलेल्या मुसळधार पावसाने लोहगाव, धानोरी, विश्रांतवाडी, येरवडा आणि नगररोड पावसाने चांगलेच झोडपले आहे.

लोहगाव परिसरात झाला मुसळधार पाऊस, उपमुख्यमंत्र्यांचा ताफा वाहतूक कोंडीत अडकला

एका तासापासून ते वाहतूक कोंडीत अडकून पडले

मुसळधार पावसाने रस्त्यांना नाल्याचे रूप आले आहे. त्यामुळे या भागातील नगर रस्त्यासह विमानतळ, लोहगाव धानोरी या रस्तावरील वाहतूक गेल्या तीन तांसापासून ठप्प आहे. या वाहतूक कोंडीत उपमुख्यमंत्री पवारही अडकले होते. रात्री आठच्या सुमारास पवार औरंगाबाद येथून पुणे विमानतळावर उतरले. तेथून ते भोसले नगर येथील निवासस्थानी निघाले. मात्र, गेल्या एका तासापासून ते वाहतूक कोंडीत अडकून पडले होते. या भागातील सर्वच रस्त्यावर पाणी साठले असल्याने रस्ते जाम आहेत, त्यामुळे पर्यायी मार्ग नसल्याने पवारांच्या वाहनांचा ताफा अडकून पडला. दरम्यान, तेथून बाहेर पडल्यानंतर ते पुढे रात्री साडे नऊच्या सुमारास पवार हे नगर रस्त्यावरील शास्त्री चौक परिसरात अडकले असे सांगण्यात आले.

हेही वाचा -धक्कादायक ! जळगावमध्ये 'पब्जी'च्या नादात 19 वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या!

ABOUT THE AUTHOR

...view details