महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पुढचे पाच दिवस पावसाचे, घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा - rains NEWS

पुणे वेध शाळेने राज्यासह गोव्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पुढील ५ दिवसात पडेल असा इशारा दिला आहे.

पुढील ५ दिवसात राज्यात अतिवृष्टीचा इशारा

By

Published : Sep 4, 2019, 8:45 PM IST

Updated : Sep 4, 2019, 9:59 PM IST

पुणे - राज्यात दोन आठवड्याच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. कोकणासह गोव्यात पुढील पाच दिवस जोरात पाऊस पडणार आहे. तर, राज्यात पुढील 48 तास जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्रात, पुणे, नाशिक, कोल्हापूर आणि साताऱ्याच्या घाट माथ्यावर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह जिल्ह्यात गुरुवारी अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात बुधवारी आणि आणि गुरुवारी चांगला पाऊस पडेल. मराठवाड्यात ही पुढील 48 तास चांगल्या पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात सहा ते आठ तारखेपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. सहा तारखेला मध्य महाराष्ट्रात आणि विदर्भाचे तीन दिवस पाऊस पडेल. मराठवाड्यात पुढील 48 तास चांगला पाऊस पडेल. सहा तारखेला मध्य महाराष्ट्रात विदर्भाचे पुढील तीन दिवस पाऊस पडेल. मराठवाड्यात सहा, सात, आठ तारखेला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडे

पुढील ५ दिवसात राज्यात अतिवृष्टीचा इशारा

हेही वाचा - पुन्हा मुंबईची तुंबई; दादर,वडाळा, नायगाव परिसरात पाणीच पाणी

पुणे जिल्ह्यात बुधवार पासून घाटमाथ्यावर जोरदार स्वरुपाचा पाऊस पडेल. विशेष करून घाट परिसरात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर नाशिक, सातारा आणि कोल्हापुरात घाटमाथ्यावर बुधवारी जोरदार पावसाचा इशारा आहे. तर कोकण गोवा आणि मुंबई जिल्ह्यात अत्यंत जोरदार पाऊस पडेल. इथ २० सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडेल. मुंबईत गुरुवारी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय. गुरुवारी मुंबईत अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. ठाणे ,पालघर ,रायगड जिल्हा बुधवारी जोरदार पाऊस पडेल. तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग पुढील पाच दिवस पाऊस पडेल. तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा - विरार ते वसई रेल्वे रुळावर पाणी; लोकल सेवा बंद

मुंबईत काही ठिकाणी मुंबई अतिवृष्टी होईल. रायगड पालघर ठाण्यात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे. २० सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडेल. तर पूण्यात शहरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, तर पुण्याच्या घाटमाथ्यावर बुधवारी आणि गुरुवारी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

Last Updated : Sep 4, 2019, 9:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details