महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राज्यात 10 ऑगस्ट नंतर पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाचा अंदाज - हवामान विभाग महाराष्ट्र

गेल्या काही दिवसांपासून चालू असलेली संततधार पुढील पाच दिवस कायम रहाणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पश्चिम महाराष्ट्रासह गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात येत्या पाच दिवसात पावसाचा जोर कायम राहणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून चालू असलेली संततधार पुढील पाच दिवस कायम रहाणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

By

Published : Aug 6, 2019, 5:14 PM IST

पुणे- राज्यात सध्या अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून चालू असलेली संततधार पुढील पाच दिवस कायम रहाणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पश्चिम महाराष्ट्रासह गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात येत्या पाच दिवसात पावसाचा जोर कायम राहणार आहे.

दहा ऑगस्ट नंतर पावसाचा जोर कमी होणार असल्याचे पुणे हवामान विभागाने सांगितले आहे. मध्य महाराष्ट्रात पुढील पाच दिवस सर्वदूर पावसाची शक्‍यता असून, कोकण व गोव्यामध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसेच नऊ आणि दहा ऑगस्टला कोकणासह मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे. यासोबत मराठवाड्यासह विदर्भातही पुढील तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबई शहर आणि परिसरामध्ये सात तारखेपासून जोरदार पाऊस होण्याची शक्यता असून, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा व सांगली या भागांतील घाट परिसराला अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details