महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राज्यात पुढील चार दिवस विजाच्या कडकडाटासह मुसळधार - विजांसह जोरदार पावसाची शक्यता

राज्यात आजपासून पुढील तीन ते चार दिवस ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Heavy rain in the state for the next four days
राज्यात पुढील चार दिवस विजाच्या कडकडाटासह मुसळधार

By

Published : Oct 5, 2021, 6:16 PM IST

Updated : Oct 5, 2021, 7:00 PM IST

पुणे - राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. पुढील चार ते पाच दिवस बहुतांश ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या पुणे खात्याने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. आज (मंगळवार) कोकण, मराठवाड्यासह विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडला आहे.

हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा -

राज्यात आजपासून पुढील तीन ते चार दिवस ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात पुढील चार ते पाच दिवस पावसाचा जोर वाढेल. काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच हवामान विभागाकडून सतर्कतेचा सूचना देण्यात आल्या आहेत.

कोकणात चार दिवस मुसळधार -

राज्यात दि. 5 ऑक्टोबर ते 09 ऑक्टोबर दरम्यान कोकण विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर या दिवशी काही भागात रिपरिप पाऊस असेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवली आहे.

मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटात -

पुढील चार दिवस मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो.

मराठवाड्यात मुसळधार -

मराठवाड्यात पुढील चार दिवस काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो तर बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

विदर्भात तुरळक ठिकाणी रिपरिप -

विदर्भात पुढील चार दिवस तुरळक रिपरिप पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - जालना : मध्यरात्री वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; अंजना नदीला पूर

Last Updated : Oct 5, 2021, 7:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details