महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पुण्यात परतीच्या पावसाची जोरदार हजेरी, येत्या चार दिवसात राज्यात पावसाचा अंदाज

बंगालच्या उपसागरात हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तो पट्टा भारताच्या दिशेने सरकत असल्याने येत्या चार दिवसांत महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे.

पावसाचे दृश्य
पावसाचे दृश्य

By

Published : Oct 10, 2020, 8:59 PM IST

पुणे -शहरात शनिवारी (दि. 10 ऑक्टोबर) दुपारी परतीच्या पावसाने काही वेळ जोरदार हजेरी लावली. भर दुपारी शहरात ढगांचा काळोख दाटून आला होता. वादळी वाऱ्यासह शहरातील सर्वच भागात जोरदार पाऊस झाला.

पुण्यात परतीच्या पावसाची जोरदार हजेरी
दरम्यान, पावसाचा परतीचा प्रवास सुरू असतानाच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. जो आंध्रप्रदेशमार्गे पुढे सरकत आहे. यामुळे येत्या चार दिवसांमध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांमध्ये दुपारनंतर विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्याचबरोबर 14 ऑक्टोबरनंतर अंदमान बेटांच्या भागात आणखी एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. तो झाल्यास पुन्हा त्यानंतर देखील पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details