पुणे - पिंपरी-चिंचवडच्या अनेक भागात पवना आणि मूळ नदीचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक कुटुंबाना सुरक्षित स्थळी हलविण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात पावसाचा हाहाकार, घरात पाणी शिरल्याने नागरिक बेघर
शहरातील जुनी सांगवीमधील मधूबन सोसायटी १ ते १०, शितोळे नगर, मुळा नगर, तर वाकड परिसरात म्हातोबा नगर, मानकर वस्ती, पिंपरीमध्ये रमाबाई नगर, आंबेडकर नगर, बौद्ध नगर, गांधी नगर तसेच पिंपरी घाट येथे मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले आहे. येथील काही भागांतील घरात पाणी शिरल्याने नागरिक बेघर झाले आहेत. मात्र,परिस्थिती हाताळण्यासाठी स्थानिक प्रतिनिधी नसल्याची ओरड नागरिक करत आहेत.

एरवी निवडणुका आल्या की नागरिकांची आठवण येते. परंतु, अशा वेळी नागरिकांना वाऱ्यावर सोडणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. अनेक जण संतप्त झाले असून आम्ही जायचे कुठे, असे विचारत आहेत. दोन दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे. पवना धारण १०० टक्के भरल्याने १४ हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर नदीत करण्यात आला आहे. तसेच लोणावळ्यातील टाटा धरणही भरले आहे. इंद्रायणी नदीत आज सकाळपासूनच विसर्ग सुरू आहे. इंद्रायणी नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.