पुणे - आरोग्य विभागाच्या पेपरफुटी प्रकरणात ( Health Recruitment scam ) पुणे सायबर पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले आहे. शिवाजीनगर न्यायालयात पुणे सायबार पोलिसांकडून 3816 पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. दरम्यान, आतापर्यंत याप्रकरणात पोलिसांनी 20 जणांना अटक केली आहे.
आरोग्य विभागाच्या 'क' आणि 'ड' गट मध्ये परीक्षेत घोटाळा झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर पोलिसांनी आरोग्य विभागाचे सहसंचालक महेश बोटले आणि प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. या आरोपिंविरोधात सायबर पोलिसांनी न्यायालयात 3816 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे.