पुणे राज्यातील जनतेला आरोग्य सेवा आता टोल फ्री क्रमांक 104 वर मिळण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करत असून त्याचे प्रायोगिक तत्त्वावर मुंबईत काम चालू आहे. 24 तास 104 टोल फ्री क्रमांकवर जर काही आरोग्याच्या समस्या असतील आणि फोन केला, तर त्या ठिकाणी त्यांना सगळ्या सुविधा आरोग्य विभाग उपलब्ध करून देईल. अर्ध्या तासांमध्ये अशी सुविधा निर्माण करत आहोत, अशी माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आज पुण्यात दिली आहे.
माता सुरक्षा अभियानआरोग्य विभागामध्ये डॉक्टरांना सुविधा असतील कर्मचाऱ्यांची भरती असेल, ज्या ज्या काही कमतरता आहेत. त्या पूर्ण भरण्यासाठी आम्ही प्लॅन तयार केलेला असून येत्या नवरात्रीमध्ये माता सुरक्षा अभियान आम्ही राबवत आहोत. त्यामुळे हा आरोग्य विभाग तुम्हाला बदललेला दिसेल तो एक- दोन वर्षांमध्ये मी बदलणार आणि या आरोग्य विभागात काम करणाऱ्या सगळ्याच स्टाफलाच्या अडचणी आहेत. त्या मी सोडवेल, त्यासाठी आम्ही काम करत आहोत, असेही यावेळी आरोग्यमंत्री तानाजी सावंत म्हणाले आहेत.
क्रिएटिव्ह काम करणारा कार्यकर्तामी जरी आरोग्य मंत्री असलो, तरी माझ्याच खात्याला मला सवाल विचारावेसे वाटतात. इतके सगळे अवस्था खराब आहे. परंतु येथे एक दोन वर्षांमध्ये आरोग्य विभागाचा चेहरा मोरा बदलण्यासाठी आम्ही काम करू मी सातत्याने क्रिएटिव्ह काम करणारा कार्यकर्ता आहे, मी पतंगरावांच्या तयार झालेला आहे. त्यामुळे आम्ही हे बदलणार असेही यावेळी तानाजी सावंत म्हणाले आहे.
मी घडलो, ते फक्त पतंगराव कदमांमुळे आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी यावेळी माजी मंत्री काँग्रेसने ते पतंगराव कदम यांच्या आठवणींना उजाळा दिलेला आहे. पतंगराव कदम असते, तर आज मुख्यमंत्री असते. परंतु मी घडलो, ते फक्त पतंगराव कदम म्हणून घडलो आहे. पतंगराव कदम नसते तर हाताने सावंत निर्माण झाला नसता. त्यामुळे पतंगराव कदम साहेबांचे माझ्यापुढे प्रचंड आशीर्वाद आहेत, आणि मी भारती विद्यापीठाचा सदस्य आहे. याचा मला अभिमान आहे, असे यावेळी तानाजी सावंत यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या वायरल फोटोवरती सुद्धा त्याने मला राजकीय काहीच माहिती नाही, मी पाहिलेले नाही. त्यामुळे मी त्यावर वक्तव्य करणे योग्य नाही, असेही यावेळी ते म्हणाले आहेत. भारती विद्यापीठ विजय मेडिकल कॉलेज ससून रुग्णालय आणि यांच्यावतीने वार्षिक हेल्थ ऑर्गनायझेशनची कॉन्फरन्स आज या ठिकाणी आयोजित केली होती. त्या कॉन्फरन्सला प्रमुख पाहुणे म्हणून आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत आज उपस्थित होते. यावेळी त्याने हे वक्तव्य केलेले आहे. या कार्यक्रमाला माजी मंत्री राज्यमंत्री डॉक्टर विश्वजीत कदम हे देखील उपस्थित होते.