पुणे -देशासह राज्यातील अनेकजण ओमायक्रॉन ( Omicron Variant ) बाधित झाले. तिसरी लाट जरी सौम्य असली तरी बाधितांची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणात होती. पण, आता राज्यातील काही शहरांमध्ये बधितांची संख्या ही कमी होताना दिसून येत आहे. 90 ते 95 टक्के बेड रिकामे आहेत, ही दिलासादायक बाब आहे, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ( Health Minister Rajesh Tope ) सांगितले. ते पुण्यात बोलत होते.
चिंता करण्याचे काहीही कारण नाही -ते म्हणाले, राज्यातील मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या ठिकाणी जी रुग्णसंख्या वाढत होती ती कमी होत आहे. मात्र, काही ठिकाणी रुग्णसंख्या ही वाढत आहे. पण, या ठिकाणी चिंता करण्याची काहीही कारण नाही. सर्वजण हे पाच ते सहा दिवसांत बरे होत आहेत, असेही यावेळी मंत्री टोपे म्हणाले.
कोरोनाचा नवा प्रकार ओमायक्रॉनसारखा फैलावणारा -एका नवीन व्हेरियंटची ( New Variant Of Corona ) चर्चा सुरू असून याबाबत मीही माहिती घेतली आहे. मात्र, याची लागण अद्याप कोणालाही झालेली नाही. नव्या व्हेरियंटबाबत जागतीक आरोग्य संघटना ( World Health Organization ) अभ्यास करत आहे. कोरोनचा नवा प्रकार हा ओमायक्रॉनसारखाच फैलावणारा असल्याचेही टोपे म्हणाले.
मास्कमुक्त महाराष्ट्राची चर्चा झालीच नाही -मास्कमुक्त महाराष्ट्राबाबत चर्चा झाल्याची माहिती काही वेळापूर्वी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली होती. मात्र, अशी कोणती चर्चाच झाली नसल्याचे स्पष्टीकरण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहे. इंग्लंड व इतर देशामध्ये मास्कमुक्त व निर्बंध शिथील करण्याबाबतचा निर्णय कोणत्या आधारावर घेण्यात आला, याबाबत राज्य व केंद्रीय टास्क फोर्सशी चर्चा करावी, अशी चर्चा झाली आहे. याबाबत अभ्यास करण्यात येणार असून भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद ( Indian Council of Medical Research )ने याबाबत काही मार्गदर्शक तत्त्वे ( Guidelines ) जाहीर करावी, अशी विनंती राज्य सरकारने करावी, अशी चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा -Ajit Pawar On Shool Reopning : 1 फेब्रुवारीपासून पुण्यातील शाळा, महाविद्यालये सुरु