महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

शाळेत केलेल्या मारहाणीचा 'त्याने' तब्बल १६ वर्षांनी घेतला बदला; केले असे काही... - Pune Crime News

पुण्यातील अमाेल कांबळे हे 24 ऑक्टोबरच्या रात्री घरी जात हाेते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या विकी शिरतर याने त्यांना थांबवून, मला ओळखले का अशी विचारणा केली. त्यावेळी अमाेल याने तु आणि मी साेबत एका वर्गात शिक्षण घेत हाेते असे म्हणाल्यानंतर, विकीने त्यास तु मला शाळेत असताना खूप मारत हाेता, आता सापडला तूला साेडणार नाही, असे म्हणत केले असे काही....वाचा पुढे काय झाले?

He took revenge for the beating at school after 16 years in pune
शाळेत केलेल्या मारहाणीचा त्याने तब्बल १६ वर्षानी घेतला बदला; केले असे काही...

By

Published : Oct 28, 2021, 4:56 PM IST

पुणे - शाळेत आपला मित्र आपल्याला मारत होता. याचा राग त्याच्या मनात तब्बल 16 वर्ष होता. याचा बदला घेण्यासाठी त्याने मित्रास भर रस्तात गाठुन तसेच राहत्या घरात शिरुन त्यास बेदम मारहाण केली. हा प्रकार पुण्यातील औंध परिसरात एम्स हाॅस्पिटल समाेर घडला आहे.

चतृश्रृंगी पाेलीस ठाण्यात फिर्याद दाखल -

यबााबत अमाेल अंकुश कांबळे (वय-३३,रा.पुणे) यांनी चतृश्रृंगी पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी विकी शिरतर व त्याचा अनाेळखी मित्र यांचे विराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आता सापडला तुला साेडणार नाही असे म्हणत मारहाण -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमाेल कांबळे हे 24 ऑक्टोबरच्या रात्री घरी जात हाेते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या विकी शिरतर याने त्यांना थांबवून, मला ओळखले का अशी विचारणा केली. त्यावेळी अमाेल याने तु आणि मी साेबत एका वर्गात शिक्षण घेत हाेते असे म्हणाल्यानंतर, विकीने त्यास तु मला शाळेत असताना खूप मारत हाेता आता सापडला तूला साेडणार नाही, असे म्हणत शिवीगाळ करुन लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर कांबळे घरात गेले असता विकी व त्याचा मित्र घरात शिरुन त्यांनी लाकडी बॅटने अमाेल यास डाेळयास, पाठीवर व हातावर मारहाण करुन जखमी केले. याबाबत चतृश्रृंगी पाेलीस पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा -धक्कादायक : बसस्थानकात ४२ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार; चार जणांवर गुन्हा दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details