पुणे- प्राप्तिकर विभागाने बुधवारी राज्यात एकावेळी १०० ठिकाणी छापे टाकले आहेत. कोल्हापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या घरासह साखर कारखाना, त्यांच्या पुण्याच्या मुलाचे घर व टाकाळा परिसरात राहणारे साडू यांच्याही घरावर छापा टाकला.
मुश्रीफांच्या मुलाच्या पुण्यातील घरावरही प्राप्तिकर विभागाचा छापा - प्राप्तिकर विभाग
प्राप्तीकर विभागाने बुधवारी राज्यात एकावेळी १०० ठिकाणी छापे टाकले आहेत. हसन मुश्रीफ यांच्या घरासह त्यांच्या मुलाच्या घरावरही प्राप्तीकर विभागाने छापा टाकला आहे.
![मुश्रीफांच्या मुलाच्या पुण्यातील घरावरही प्राप्तिकर विभागाचा छापा](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3941112-thumbnail-3x2-pk.jpg)
हसन मुश्रीफ
मुश्रीफांच्या मुलाच्या घरावर छापा
पुण्यात कोंढवा परिसरात मुश्रीफ यांचा मुलगा साजीद राहत असलेल्या आशोका म्युझ सोसायटीतही प्राप्तिकर विभागाकडून छापा टाकण्यात आला आहे. या ठिकाणी प्राप्तिकर विभागाचे अधिकारी घराची झडती घेत आहेत. हसन मुश्रीफ यांच्या घरावर व इतर ठिकाणी छापे पडल्याने यात राजकारण आहे का? याची चर्चा सुरू आहे.
Last Updated : Jul 25, 2019, 3:20 PM IST