पुणे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ( Pune Mnc Har Ghar Tiranga Initiative ) महापालिकेकडून ( Pune Municipal Corporation ) १३ ते १५ ऑगस्ट ( Indian Independence Day ) या कालावधीत हर घर तिरंगा उपक्रम ( Har Ghar Tiranga Campaign ) राबविण्यात येणार आहे. त्या अंतर्गत पाच लाख तिरंग्यांचे विनामूल्य वाटप केले जाणार आहे. क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत ३०० केंद्रेही त्यासाठी करण्यात आली आहेत. त्यासाठी महापालिकेने ( Har Ghar Tiranga Initiative Pune MNC ) पाच लाख झेंड्यांची खरेदी केली असून, कंपन्यांचा सामाजिक भाग आणि शासनाकडून महापालिकेला एकूण बारा लाख झेंडेसुद्धा उपलब्ध झाले आहेत.
महापालिकेला उपलब्ध झालेले झेंडे निकृष्ट या पूर्वी महापालिकेला उपलब्ध झालेले झेंडे निकृष्ट दर्जाचे असल्याने ते परत पाठविण्याची नामुष्की महापालिकेवर ओढवली होती. मात्र, महाालिकेला मिळालेल्या एकूण झेंड्यांपैकी केवळ २० टक्के झेंड्यांचे वितरण योग्य असल्याचे पुढे आले आहे. महापालिकेला उपलब्ध झालेल्या झेंड्यांची गुणवत्ता तपासून वितरण केले जात आहे. मात्र, उर्वरित झेंड्यांचे काय करायचे, असा प्रश्न महापालिकेपुढे उपस्थित झाला आहे.
उर्वरित झेंडे पुरवठादारांकडे पाठविण्याचा महापालिकेचा निर्णय महापालिकेकडून शहरातील पंधरा क्षेत्रीय कार्यालयांना चार लाख झेंड्यांचे वितरण करण्यात आले आहे. त्यापैकी शुक्रवारी संध्याकाळपर्यंत केवळ अडीच लाख झेंड्यांचे वितरण क्षेत्रीय कार्यालयांकडून करण्यात आले. त्यामुळे उर्वरित झेंडे पुरवठादार ठेकेदारांकडे पाठविण्यात येणार आहेत. शासनाकडून महापालिकेला २ लाख ७१ हजार, कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून पाच लाख झेंडे उपलब्ध झाले आहेत. तर ४ लाख ७५ हजार झेंड्यांची खरेदी महापालिकेने केली आहे.