पुणे - गुढीपाडव्याच्या दिवशी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंगे काढा अन्यथा हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) लावू असा आदेश दिला होता. त्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. पुण्यात तर भोंगा प्रकरणी मनसैनिकांमध्ये गटबाजी पाहायला मिळाली. यानंतर आता पुण्यात थेट राज ठाकरे (Raj Thackeray Hanuman Chalisa Recitation) यांच्याहस्ते खालकर चौकात हनुमान जयंतीच्या (Khalkar Chowk Hanuman Temple) निमित्ताने महाआरती आणि सामूहिक हनुमान चालीसा पठण करण्यात आले. त्यामुळे एका प्रकारे भोंगे प्रकरणावरून राज्य सरकारला थेट इशारा देण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांच्याकडून करण्यात आला.
Raj Thackeray Hanuman Chalisa Recitation : पुण्यात राज ठाकरेंच्या उपस्थितीत सामूहिक हनुमान चालीसा पठण - खालकर चौक मारुती मंदिरात हनुमान जयंती उत्सव
पुण्यात थेट राज ठाकरे (Raj Thackeray Hanuman Chalisa Recitation) यांच्याहस्ते खालकर चौकात हनुमान जयंतीच्या (Khalkar Chowk Hanuman Temple) निमित्ताने महाआरती आणि सामूहिक हनुमान चालीसा पठण करण्यात आले. त्यामुळे एका प्रकारे भोंगे प्रकरणावरून राज्य सरकारला थेट इशारा देण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांच्याकडून करण्यात आला.
हजारो मनसे कार्यकर्ते उपस्थित -पुण्यातील खालकर चौक मारुती मंदिरात हनुमान जयंती उत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवास मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते. त्यांच्या शुभहस्ते महाआरती तसेच सामूहिक हनुमान चालीसा पठण करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात मनसैनिक उपस्थित होते.
राष्ट्रवादीकडून रोझा इफ्तार -पुणे शहरात आज हनुमान जयंतीनिमित्ताने एकीकडे मनसेच्यावतीने सामूहिक हनुमान चालीसा, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने कोथरूड येथे मुस्लिम बांधवांसाठी रोझा इफ्तार आणि हनुमान चालीसा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील उपस्थित होते.