पुणे:- बोगस एनए ऑर्डर व बांधकाम परवानगीच्या सहाय्याने अनधिकृत सदनिकांची दस्तनोंदणी करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रकरणांमध्ये 4 व्यक्तींना हडपसर पोलीसांकडून अटक करण्यात आली आहे. यात 2 बिल्डर तर 2 वकील यांचा समावेश आहे, अशी माहिती डिसीपी नम्रता पाटील यांनी दिली आहे.
बनावट एनए ऑर्डर प्रकरण : पुण्यात 4 जण घातल्या बेड्या; 2 बिल्डर तर 2 वकिलांचा समावेश - हडपसर पोलीस कारवाई
भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) बड्या अधिकाऱ्यांच्या नावाने ६७ बनावट 'एनए ऑर्डर', तर महापालिकेच्या नावावर ३७ बनावट भोगवटा पत्र अशा सुमारे शंभरहून अधिक केसेस तपासणीत आढळून आल्या आहेत.
![बनावट एनए ऑर्डर प्रकरण : पुण्यात 4 जण घातल्या बेड्या; 2 बिल्डर तर 2 वकिलांचा समावेश hadapsar police](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-14792460-813-14792460-1647866457098.jpg)
hadapsar police
पोलिसांनी दिली माहिती
4 जणांना केली अटक
स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेच्या वतीने 3 महिन्यांपूर्वी मुद्रांक जिल्हाधिकारी अनिल पारखे यांना याबाबत पत्र देण्यात आलं होतं. यानंतर चौकशी केली असता हे प्रकरण उघडकीस आलं आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, 4 जणांना अटक करण्यात आली आहे. आणखी काही एजंटवर कारवाई करण्यात येणार आहे.
हेही वाचा -Stolen Sixteen Lakh : एटीएममध्ये पैसे भरणाऱ्या कर्मचाऱ्याने लुटले सोळा लाख रुपये