महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Gunaratna Sadavarte On ST Strike : विलनीकरणाचा लढा दाबून दाखवा; बारामतीतून सदावर्तेचे पवारांना आव्हान

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( NCP Leader Sharad Pawar ) व उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy Cheif Minister Ajit Pawar ) यांनी एसटी कामगारांचा शासकीय सेवेतील विलणीकरणाचा ( Merger Of ST In State Government ) लढा दाबून दाखवावा, असे आव्हान गुणरत्न सदावर्ते (Sadavarte challenge to Sharad Pawar from Baramati ) यांनी दिले आहे.

Sadavarte challenge to Sharad Pawar
Sadavarte challenge to Sharad Pawar

By

Published : Dec 19, 2021, 4:40 PM IST

बारामती -राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( NCP Leader Sharad Pawar ) व उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy Cheif Minister Ajit Pawar ) यांनी एसटी कामगारांचा शासकीय सेवेतील विलणीकरणाचा ( Merger Of ST In State Government ) लढा दाबून दाखवावा, असे आव्हान गुणरत्न सदावर्ते (Sadavarte challenge to Sharad Pawar from Baramati ) यांनी दिले आहे. तसेच तुमच्यासाठी हा संप असला तरी आमच्यासाठी दुखवटा आहे, असेही यावेळी ते म्हणाले.

प्रतिक्रिया

काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते -

बारामती येथील एमआयडीसी आगाराजवळ मागील ४५ दिवसांपासून एसटी कामगारांचे शासकीय सेवेमध्ये विलनीकरणासाठी दुखवटा आंदोलन सुरू आहे. एसटी कामगारांच्या या दुखवटा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गुणरत्न सदावर्ते यांनी बारामतीमध्ये हजेरी लावली. यावेळी ते बोलत होते. सदावर्ते पुढे म्हणाले, शरद पवारांनी साखर सम्राट घडवले. त्यांचे ते अराध्य दैवत झाले. मात्र, त्यांना कामरागांचे कैवारी होता आले नाही. पवारांनी लोकांची दिशाभूल करून पावसात मतांचा जोगवा मागितला. उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब म्हणतात कामगारांनी आंदोलन ताणू नये. मात्र, ज्याचे जळत त्यालाच कळते. मात्र, तुम्ही आमचा विलनीकरणाचा लढा दाबू शकत नाही. आम्हाला निलंबणाची, सेवासमाप्तीची भीती वाटत नाही, असेही यावेळी सदावर्ते म्हणाले. यावेळी जयश्री पाटील, दशरथ राऊत, काळूराम चौधरी आदी उपस्थित होते.

'राज्य शासाकडून उद्या चर्चेचे आमंत्रण' -

बारामती येथे बोलताना गुणरत्न सदावर्ते यांनी राज्य शासनावतीने शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री सुभाष देसाई यांच्याकडून आम्हाला चर्चेसाठी आमंत्रण आले आहे. देसाई यांनी संविधानीक बाबींवर चर्चा करण्यासाठी उद्या सकाळी ९ वाजता बोलवले असल्याची माहिती यावेळी सदावर्ते यांनी दिली.

हेही वाचा - Shah In Dagdusheth Temple : आत्मनिर्भर भारताचे ध्येय पूर्ण होवे..अमित शहा यांचे बाप्पाला साकडे

ABOUT THE AUTHOR

...view details