पुणे - म्हणतात ना पुण्यात जे पिकत ते जगभरात विकल जात. असे नेहेमी विविध माध्यमातून म्हटल जाते पण आज याची प्रचिती आली आहे. कोणताही आनंदाचा क्षण असो की वाढदिवस असो आपण केक ( Cake ) घरी आणतच असतो.सध्या केकमध्ये देखील नवनवीन प्रयोग होत असून वेगवेगळ्या प्रकारे केक सध्या बाजारात विकले जात आहे. पण पुण्यातील पुरंदर तालुक्यातील मुबलक प्रमाणात उत्पादित होणाऱ्या रत्नदीप या पेरू पासून ( cake made from guava ) पुण्यातील सुप्रसिद्ध अशा कयानी बेकरीने ( Kayani Bakery ) केक बनविला आहे.आणि आत्ता या केकची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे.
अशी झाली सुरवात -पुरंदर तालुक्यात मोठ्या प्रमाणत विविध फळांचं उत्पादन केलं जात. या फळांपासून विविध पदार्थ बनवावे आणि ते देश विदेशात पोहचावे या उद्देशाने काही तरुणांनी पुरंदर हायलाईट्स ( Purandar highlights ) अशी कंपनी सुरू केली.आणि गेल्या दीड वर्षांपासून फळांपासून केक बनवण्याचा प्रयोग काही शेतकऱ्यांप्रती आस्था असणाऱ्या पुरंदर हायलाईट्सच्या माध्यमातून सुरू होत. पुरंदर तालुक्यात मुबलक प्रमाणात उत्पादित होणाऱ्या रत्नदीप या पेरूच्या वाणाची निवड करून पुरंदर तालुक्यातील शेतकरी, पुण्यातील कयानी बेकरी यानी एकत्र येत एक प्रयोग केला. त्यापासून पुरंदर पेरु केकची निर्मिती ( Production of Purandar Guava Cake in Pune ) केली आहे. या केकची चव ही विशेष असून लाल गर असणाऱ्या पेरुपासून याची निर्मिती करण्यात आली आहे.अशी माहिती यावेळी पुरंदर हायलाईट्सचे प्रमुख राहुल उरसळ यांनी यावेळी दिली.