महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Ajit Pawar Criticized Central-Government : जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी कर अन्यायकारक - अजित पवार - levy 5 persentGST on essential commodities

जीवनावश्यक वस्तूंवर केंद्र सरकारने 5% जीएसटी आकारण्याचा ( levy 5% GST on essential commodities ) जो निर्णय घेतला आहे. तो अतिशय अन्यायकारक आहे. या निर्णयाचा फटका गोरगरीब व मध्यमवर्गीयांना ( Impact on Poor and Middle Class ) बसतो. उद्याच्या पावसाळी अधिवेशनात या निर्णयाबाबत प्रश्न उपस्थित करून आवाज उठवणार असल्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार ( Leader of Opposition Ajit Pawar ) यांनी बारामतीत पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Opposition Leader Ajit Pawar
विरोधी पक्ष नेते अजित पवार

By

Published : Jul 16, 2022, 3:11 PM IST

बारामती : बारामतीमध्ये अजित पवार ( Leader of Opposition Ajit Pawar ) यांनी माध्यमांशी संवाद साधताना केंद्र सरकारवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, जीवनावश्यक वस्तूंवर केंद्र सरकारने 5% जीएसटी आकारण्याचा जो निर्णय घेतला आहे. तो अतिशय अन्यायकारक आहे. या निर्णयाचा फटका गोरगरीब व मध्यमवर्गीयांना बसतो. ( Impact on Poor and Middle Class ) उद्याच्या पावसाळी अधिवेशनात या निर्णयाबाबत प्रश्न उपस्थित करून आवाज उठवणार असल्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी बारामतीत पत्रकारांशी बोलताना सांगितले.


बारामतीतील व्यापाऱ्यांचा जीएसटी विरोधात निवेदन : केंद्राने घेतलेला हा निर्णय मागे घेण्यासाठी बारामतीतील व्यापाऱ्यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, वंदना चव्हाण यांना निवेदन दिले आहे. या निर्णयामुळे महागाईत वाढ होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी या निर्णयावर फेरविचार करून जीवनावश्यक वस्तूंवर आकारण्यात आलेला पाच टक्के जीएसटी कर रद्द करण्यात यावा, असेही पवार यांनी सांगितले.

नामांतराबाबत आता बोलणे उचित नाही : नामांतराबाबत विचारलेल्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की, नवीन सरकार जेव्हा सत्तेवर येते तेव्हा मागील सरकारने घेतलेले काही निर्णय फेरविचार करता घेत असतात हा त्यांचा अधिकार आहे. राज्याच्या हिताचे जे निर्णय असतात ते निर्णय नवे सरकार शक्यतो बदलत नाहीत. नामांतराबाबत प्रसार माध्यमातून समजले आहे. मात्र, जोपर्यंत याबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत याबाबत बोलणे उचित ठरणार नसल्याचे पवारांनी सांगितले.

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अजून नाही : राज्यात सरकारला बहुमत मिळाले असतानाही मंत्रिमंडळाचा विस्तार न करणे अनाकलनीय आहे. पाऊस पडत असताना सर्वत्र पालकमंत्री तातडीने नेमणे. त्यांच्यावर तेथील जबाबदारी देणे, जेथे जीवितहानी होण्याचा संभव आहे. वाहतुकीचा खोळंबा होत आहे. अशा ठिकाणी तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. तसेच, चांद्यापासून बांद्यापर्यंत पावसामुळे अडचणीत असलेल्या लोकांना दिलासा द्यावा. असेही पवार यावेळी म्हणाले.

हेही वाचा :Supriya Sule Criticized New Government in Pune : पेट्रोल-डिझेलचे भाव कमी; ये सब गोलमाल है : सुप्रिया सुळेंची शिंदे सरकारवर टीका

ABOUT THE AUTHOR

...view details