पुणे-ग्राहक पेठेतर्फे व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मार्फत २१०० धान्याचे किट रेशन कार्ड नसलेल्या बाहेरगावातील कुटुंबांना, गरजू विद्यार्थ्यांना देण्यात आले. शहर व उपनगरांतील विविध भागांमध्ये संघाच्या कार्यकर्त्यांनी हे किट पोहोचविले आहेत.
ग्राहक पेठेतर्फे २१०० कुटुंबांना धान्याचे किटचे वाटप; उपक्रमाला पुणेकरांचा देखील पाठींबा - suryakant Pathak
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत व सामान्य नागरिकांच्या सहकार्याने ग्राहक पेठेमार्फत धान्याच्या किटचे वाटप करण्यात आले. ग्राहक पेठेने 2100 कुटुंबाना धान्याचे किट वाटले आहेत.
![ग्राहक पेठेतर्फे २१०० कुटुंबांना धान्याचे किटचे वाटप; उपक्रमाला पुणेकरांचा देखील पाठींबा](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6760711-1048-6760711-1586673877123.jpg)
टिळक रस्त्यावरील ग्राहक पेठेमार्फत ग्राहकांच्या दृष्टीने अनेक उपक्रम राबविले जातात. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत व सामान्य नागरिकांच्या सहकार्याने हे किट देण्यात आले आहेत. उपक्रमाकरीता शैलेश राणीम, किरण गुंजाळ, उदय जोशी, सुनील वाणी यांसह सूर्यकांत पाठक, अनंत दळवी, अलका दळवी, व्यावसायिक धवल शहा, राजेश शहा यांनी पुढाकार घेतला.
जीवनावश्यक वस्तूंच्या या किटमध्ये पाच किलो गव्हाचे पीठ, दोन किलो तांदूळ, एक किलो तूर डाळ, दोन किलो साखर, एक लिटर तेल, २०० ग्रॅम चहा व २०० ग्रॅम मसाला इत्यादी साहित्य देण्यात आले आहे. पुणेकरांनी या उपक्रमाकरीता सहकार्य करुन गरजूंपर्यंत किट पोहोचविण्यास आम्हाला मदतीचा हात द्यावा, असे आवाहन सूर्यकांत पाठक यांनी केले. नागरिकांना या उपक्रमास सहकार्य करायचे असल्यास त्यांनी ग्राहक पेठेशी संपर्क साधावा ,असे आवाहन करण्यात आले आहे.